कल्याण – कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमधील काही डब्यांमधील वातानुकूलित यंत्रणा दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवासी लोकलच्या डब्यात बटाट्यासारखे उकडून निघत आहेत. उकाड्यामुळे बहुतांशी प्रवासी वातानुकूलित लोकलला आता पसंती देत आहेत. डब्यात घुसल्यानंंतर काही क्षणात प्रवाशांना डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांचा संताप होत आहे.

अगोदरचा उकाड्याने नागरिकांचा घामटा निघाला आहे. सकाळची वेळ असली तरी उकाडा प्रवाशांची पाठ सोडत नाही. सकाळची वेळ असूनही घाम पुसून पुसून प्रवाशांंचे रुमाल ओलेचिंब होत आहेत. अशा परिस्थितीत वातानुकूलित लोकलमधून मस्त समाधानाने प्रवास करून या विचाराने या लोकलमध्ये चढून मुंबईपर्यंतचा प्रवास करणारे प्रवासी लोकलमधील वातानुकूलन यंत्रणा बंद राहत असल्याने संताप व्यक्त करत आहेत. वातानुकूलित लोकलमधील शीत यंत्रणा सुरू आहे की नाही हे लोकल सुरू करण्यापूर्वी कारशेडमध्ये तपासले जाते की नाही, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा
MIDC accelerates Rs 650 crore flyover works including alternative roads in Hinjewadi IT Park
हिंजवडी आयटी पार्क लवकरच ‘कोंडी’मुक्त! पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या ६५० कोटींच्या कामांना एमआयडीसीकडून गती
Akola Railway gate, Railway gate closed, Akola ,
अकोला : आठ दिवस रेल्वे फाटक बंद, नागरिकांना मनस्ताप
nagpur encroachment on garden lands
विकासाच्या नावाखाली अतिक्रमण, नागपुरातील काही उद्याने बंद, जागेवर व्यावसायिकांचा डोळा ?

हेही वाचा – उल्हासनगरात ३१६ धोकादायक इमारती, ५ इमारती राहण्यासाठी अयोग्य, तर ४३ मध्ये तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज

कल्याणमधून सकाळी सुटणारी वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर सकाळी नऊ वाजता येते. ही लोकल मुंबईत कार्यालयीन वेळेपूर्वी पोहोचत असल्याने बहुतांशी प्रवाशांची या लोकलला पसंती असते. गेल्या दोन दिवसांपासून प्रवासी या लोकलमध्ये चढत आहेत. लोकलमध्ये चढल्यानंतर काही डब्यांमधील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास येत आहे. शीत यंत्रणा बंद असेल तर प्रवाशांना डब्यामध्ये सूचना करणारे एक लाल बटन आहे. ते दाबल्यानंतर मोटरमन, गार्डकडून त्याची दखल घेतली जाते. हे सूचना बटन दाबूनही त्याची मोटारमन, गार्डकडून दखल घेतली जात नाही, असे डोंबिवलीतील एक प्रवासी तुषार साठे यांनी सांगितले.

एकदा वातानुकूलित लोकलमध्ये चढल्यानंंतर पुन्हा ती लोकल सोडून दुसऱ्या लोकलमध्ये चढणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे कोंडमारा करत, गुदमरत प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करत आहेत. अनेक प्रवाशांंना अती उकाड्यामुळे डब्यात अस्वस्थ वाटू लागले की ते पुढील रेल्वे स्थानकात उतरत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. प्रवासी वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतात. पण दरवाजेही उघडत नसल्याने जीव गुदमरत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा – उल्हासनगरात ३१६ धोकादायक इमारती, ५ इमारती राहण्यासाठी अयोग्य, तर ४३ मध्ये तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी सोशिक आहेत, असे समजून वातानुकूलित लोकलमधील बिघाड नाही काढला तरी चालेल असा विचार रेल्वे अधिकाऱ्यांनी करू नये. अन्यथा, रेल्वे प्रवाशांच्या उद्रेकाला एक दिवस रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

सकाळच्या कल्याण-सीएसएमटी लोकलमधील काही डब्यांमधील वातानुकूलित यंत्रणा बंद राहत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. डब्यात सूचना बटन असूनही त्याचाही उपयोग होत नसल्याने प्रवासी डब्यामध्ये अक्षरश बटाट्यासारखे उकडून निघत आहेत. लोकल प्रवासी सेवेत सोडण्यापूर्वी त्यामधील शीत यंत्रणा सुरू आहे की नाही हे तपासण्याची तसदी तांत्रिक विभागाने घ्यावी. काही दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होईल का. – तुषार साठे, प्रवासी.

Story img Loader