अंबरनाथ : अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्यानंतर अंबरनाथ, बदलापूर आणि मुरबाड तालुक्यातील चिंता वाढली आहे. हा कर्मचारी बदलापूर येथे राहत असून त्याचे मूळ गाव मुरबाड तालुक्यात आहे. या कर्मचाऱ्याचा चाचणी अहवाल येण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्याने मुरबाडमधील दोन गावांमध्ये संचार केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बदलापूरसह मुरबाड तालुक्यातही चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एका २९ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. या प्रकारामुळे अंबरनाथ पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील काही कर्मचाऱ्यांचे अहवाल नकारात्मक आले असून त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

मात्र हा पोलीस कर्मचारी राहत असलेल्या बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा परिसरातील काही नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील काही व्यक्ती या संबंधित नगरसेवकासाठी मदतकार्य करणारे असल्याचे समजते आहे.