दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांची वणवण सुरूच
ठाणे : जिल्ह्यात आठवडाभरानंतर सोमवारी मोठ्या संख्येने सुरू झालेल्या लसीकरण केंद्रावरील लशींचा साठा दिवसभरात संपल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, आणि बदलापूर पालिकांनी मंगळवारी लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती. गेल्या काही दिवसांपासून लशींच्या तुटवड्यामुळे आठवड्यातून एक ते दोन दिवसच लसीकरण केंद्रे सुरू राहात असून यांमुळे लशीच्या दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र आहे.
लस तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय निर्माण होत आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्याला लशींचा साठा उपलब्ध होतो, पण एक ते दोन दिवसांत संपत आहे. त्यानंतर तीन ते चार दिवसांनी नवीन साठा जिल्ह्याला मिळतो. यामुळे आठवड्यातून एक ते दोन दिवसच लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याची वेळ पालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनावर ओढावली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून हेच चित्र आहे. कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा घेतलेल्या अनेक नागरिकांचा ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून ते आता दुसऱ्या मात्रेसाठी लसीकरण केंद्रांच्या शोधात वणवण फिरत आहेत. यामुळेच ज्या दिवशी लसीकरण केंद्रे सुरू असतात, त्या दिवशी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रांवर केवळ दोनशे ते तीनशे नागरिकांना दिवसभरात लस देण्याचे नियोजन आधीच आखण्यात आलेले असते. परंतु केंद्रांवर त्यापेक्षाही जास्त नागरिक येतात आणि लस देण्याचा आग्रह धरतात. यामुळे लसीकरण केंद्रांवरील कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. आठवडाभरानंतर सोमवारी जिल्ह्यात मोठ्या संख्येने लसीकरण सुरू झाले, त्यावेळेस अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. दरम्यान, सोमवारी दिवसभरात लशींचा साठा संपल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी जिल्ह्यातील अनेक केंद्रे बंद होती. या केंद्रांवरून नागरिकांना लसीविनाच माघारी परतावे लागले असून या लस तुटवड्याबाबत नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहेत.
केंद्रे सुरू होतील याबाबत प्रश्नचिन्ह
ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरातील लशींचा साठा सोमवारी दिवसभरात संपला. या ठिकाणी नवीन साठा उपलब्ध झाला नसल्यामुळे या शहरातील लसीकरण केंद्रे बंद होती. भिवंडी पाच, ठाणे ग्रामीण नऊ आणि उल्हासनगरमधील सहा या केंद्रांवर लसीकरण सुरू होते. शासकीय केंद्रांवर लससाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेकजण खासगी केंद्रांचा आधार घेऊन सशुल्क लसीकरण करण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्ह्याला लशीचा नवीन साठा अद्याप प्राप्त झालेला नसल्याने बंद झालेली ही केंद्रे पुन्हा कधी सुरू होतील याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
आज लसीकरण सुरू
ठाणे जिल्ह्याला मंगळवारी सायंकाळी २५ हजार कोव्हिशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी ठाणे शहराला ५ हजार ५००, कल्याण- डोंबिवली शहराला ४ हजार ७५०, उल्हासनगरला १ हजार २५०, भिवंडीला १ हजार ७५०, मीरा-भाईंदरला २ हजार ७५०, नवी मुंबईला ३ हजार ७५० आणि ठाणे ग्रामीण भागाला ५ हजार २५० लशींचा साठा मिळाला आहे. त्यामुळे बुधवारी ठाणे शहरातील ४५ केंद्रांवर तर, कल्याण -डोंबिवलीतील दोन केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागातही लसीकरण सुरू राहणार आहे.