ठाणे : ठाणे जिल्ह्यात लशीच्या तुटवड्यामुळे मागील काही दिवसांपासून रडतखडत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला आता वेग आल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २९ लाख ७१ हजार १६५ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतला असून त्यामध्ये १० लाख ६६१ नागरिकांची लशीची दुसरी मात्रा पूर्ण झाला आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्याला गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने लस साठा उपलब्ध होत असल्यामुळे लसीकरण वेगाने सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्याला रविवारी ७८ हजार लशींचा साठा उपलब्ध झाला असून सोमवारीही मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रे सुरू असल्याचे पाहायला मिळाले. ठाणे जिल्ह्यात पूर्वी आठवड्यातून एक ते दोन वेळाच ५० ते ६० हजार लशीचा साठा प्राप्त होत होता. हा साठा लाभार्थी नागरिकांच्या तुलनेत कमी असल्यामुळे याचे महापालिका तसेच जिल्हा परिषद निहाय्य वितरण करताना जिल्हा आरोग्य विभागासमोर पेच निर्माण होत. अवघ्या एक ते दोन दिवसात हा साठा संपत असे त्यानंतर, नवीन साठा उपलब्ध होईपर्यंत जिल्ह्यातील अनेक केंद्रे बंद ठेवण्याची वेळ महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनावर येत होती. करोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासातून प्रवास करण्यास परवानगी दिली असल्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली आहे.
ठाणे जिल्ह्यात लसीकरण वेगाने
करोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासातून प्रवास करण्यास परवानगी दिली असल्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-08-2021 at 00:27 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona vaccine positive rate akp