ठाणे : जिल्ह्याला शुक्रवारी १ लाख ४३ हजार लसमात्रांचा साठा राज्य शासनाकडून उपलब्ध झाला असतानाच,  शनिवारी आणखी ४३ हजार कोव्हिशील्ड मात्रांचा साठा जिल्ह्याला मिळाला आहे.  जिल्ह्याला लागोपाठ दोन दिवस लशीचा साठा उपलब्ध झाल्यामुळे आठवडाभर तरी लसीकरण मोहिमेत खंड पडणार नाही, असे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लशीच्या तुटवड्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरातील लसीकरण केंद्रे दोन ते तीन दिवसांपासून बंद होती.  इतर शहरातील लसीकरण केंद्रेही बंद होण्याच्या मार्गावर होती. शनिवारी ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरात लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झाली.

ठाणे शहरात तीन दिवसानंतर लसीकरण केंद्रे सुरु झाल्याने नागरिकांनी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. कल्याण-डोंबिवली शहरातही अशीच परिस्थिती होती.