ठाणे महापालिका क्षेत्रात ३१ ते ४० वयोगटातील ४ हजार ७१ सक्रिय रुग्ण; रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त

ठाणे : करोनाच्या तिसऱ्या लाटेत ३१ ते ४० वयोगटातील नागरिकांना बाधा होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पालिका क्षेत्रात या वयोगटातील ४ हजार ७१ सक्रिय रुग्ण आहेत. मात्र, या लाटेत रुग्णांना सौम्य लक्षणे असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.  ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीला १६ हजार २५० सक्रिय रुग्ण असून यापैकी सर्वाधिक म्हणजेच ४ हजार ७१ रुग्ण हे ३१ ते ४० वयोगटातील आहेत. मात्र, यामध्ये अनेकांना सौम्य लक्षणे किंवा काहींना लक्षणे नसल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. ठाणे महापालिका प्रशासनाने करोना रुग्णांची त्यांच्या वयोगटाप्रमाणे वर्गवारी केली आहे. यामध्ये ३१ ते ४० वयोगटातातील नागरिकांपाठोपाठ यंदाच्या लाटेत २१ ते ३० तसेच ४१ ते ५० वयोगटातील रुग्णांचाही समावेश आहे. २१ ते ३० वयोगटातील ३ हजार १०७  रुग्णांवर तर, ४१ ते ५० या वयोगटातील २ हजार ९७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

या वयोगटाचे कामानिमित्त घरबाहेर पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जास्त करून रुग्ण हे या वयोगटातील आढळून येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर, या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी असून ठाणे महापालिका क्षेत्रात मागील दोन आठवडय़ात दोन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. हे रुग्ण ४५ वर्षांवरील होते, अशी माहिती ठाणे महापालिका प्रशासनामार्फत देण्यात आली.

लहान मुलांवर घरीच उपचार

ठाणे शहरात ० ते १० वयोगटातील ५७६ मुले सध्या करोना बाधित आहेत. परंतू, यांच्यामध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे यापैकी एकाही मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. करोनासाठी वापरण्यात येणारे औषध १८ वर्षांखालील मुलांना देणे शक्य नाही. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप या आजारांवर त्यांच्या वयोगटासाठी वापरण्यात येणारी औषधेच या वयोगटाला दिली जात आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.