कल्याणमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्याची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. दुबईहून कल्याणात परतलेल्या त्या महिलेला कोणत्याही प्रकारची लागण झालेली नसल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने बुधवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य शासनाकडून याबाबतची माहिती आल्यानंतर केडीएमसी वैद्यकीय विभागाच्या पथकाने संबंधित महिलेची तपासणी केली असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळली नसल्याचेही वैद्यकीय विभागातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या महिलेला घरच्या घरीच कॉरनटाईन करण्यात आले असून पुढील १४ दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

दुबईहून परतलेल्या ४० जणांच्या ग्रुपसोबत ती महिला होती मात्र या महिलेला कोणत्याही प्रकारची लागण झालेली नसल्याचेही वैद्यकीय विभागाने एलएनएनशी बोलताना सांगितले. तसेच नागरिकांनीही कोणतीही चुकीची माहिती पसरवू नये किंवा घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याचे आवाहनही केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.

अफवा पसरावणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार – डीसीपी
करोनाबाबत किंवा संबंधित महिलेबाबत सोशल मिडियावर अधिकृत शासकीय माहितीशिवाय पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus women under medical supervision in kalyan nck