ठाणे महापालिका क्षेत्रात पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी पालिका आरोग्य विभागाने आठवडाभर घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण मोहिम राबविली असून त्याचसोबत आरोग्य विभागाने ‘हर घर दस्तक’ हा उपक्रमही राबवून त्यात २१ हजार ५९४ नागरिकांचे करोना लसीकरण केले. या उपक्रमात ५ लाख ७० हजार घरांना भेटी देऊन करोना लसीकरणाचा आढावा घेण्यात आला असून उर्वरित १ लाख ५५ हजार घरांचे सर्वेक्षण लवकरच केले जाणार आहे. या उपक्रमात शहराबाहेर सात टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्याचे समोर आल्याने शहरात लसीकरणाची टक्केवारी ९८ टक्क्यांपर्यत पोहचली आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत करोनाची पहिली मात्रा घेतल्यांची टक्केवारी ९१ टक्के तर, दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी ७६ टक्के इतकी आहे. शहरात शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत पोलिओ सोबतच करोना लसीकरण मोहिम राबविण्यात आली. ठाणे महापालिकेची शहरात एकूण १ हजार ६५० पोलिओ बुथ असून याठिकाणी पालिकेने पथके नेमलेली आहेत. या पथकांनी २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत घरोघरी जाऊन बालकांना पोलिओचे डोस दिले. त्याचबरोबर करोना लस घेतलेली नाही अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले.

india census
जनगणना पुढील वर्षी; पुढील लोकसभा निवडणूक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर घेण्याचा विचार
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
cash seized Maval, Maval, Pimpri, Maval latest news, Maval cash news,
पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त
Loneliness-Free Seoul
एकाकी मृत्यू म्हणजे काय? त्यांची संख्या का वाढतेय? ते रोखण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक कशासाठी?
Why antimicrobial resistance is a major challenge facing the healthcare sector
प्रतिसूक्ष्मजीव रोधकता हे आरोग्यक्षेत्रासमोरील मोठे आव्हान का आहे?
lokjagar nepotism in the political families kin of influential leaders get ticket for assembly polls
लोकजागर : घराणेशाहीच्या टीकेला ‘घरघर’
polio cases rising in pakistan
पाकिस्तानसमोर नवे संकट; पोलिओ रुग्णसंख्येत वाढ, कारण काय? याचा काय परिणाम होणार?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस :  प्रक्रिया धुडकावून अधिसूचना

आरोग्य विभागाने ‘हर घर दस्तक’ हा उपक्रमात ५ लाख ७० हजार ४३ घरांना भेटी देऊन करोना लसीकरणाचा आढावा घेतला. शहरात एकूण ११ लाख ९६ हजार ५२४ नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी ११ लाख ७५ हजार ९०९ नागरिकांनी करोना लशीची पहिली मात्रा घेतली आहे. त्यापैकी १० लाख ६८ हजार ८६१ नागरिकांनी महापालिका क्षेत्रात तर, १ लाख ७ हजार ४८ नागरिकांनी महापालिका क्षेत्राबाहेर लशीची मात्रा घेतली आहे. या मोहिमेत २१ हजार ५९४ नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.

शहराचे लसीकरण ९८ टक्के

ठाणे महापालिका क्षेत्रात १० लाख ६८ हजार ८६१ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून त्याची टक्केवारी ९१ टक्के इतकी आहे. परंतु शहरातील १ लाख ७ हजार ४८ नागरिकांनी महापालिका क्षेत्राबाहेर जाऊन लशीची पहिली मात्रा घेतलेली असून त्याचे प्रमाण ७ टक्के इतके असल्याची बाब पालिका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे ९८ टक्के इतके लसीकरण झाल्याचे आता स्पष्ट होत आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.