एखाद्या मजल्यावर करोना रुग्ण सापडल्यास त्या मजल्यावरील सर्व रहिवाशांच्या चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. यानंतर आरोग्य विभागाने मंगळवारी सकाळपासूनच प्रक्रियेला सुरूवात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक करोना रुग्ण माजिवडा मानपाडा क्षेत्रात सापडत आहेत. म्हणजेच, घोडबंदर भागातील उच्च मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू वसाहतीमध्ये अधिकाधिक करोना रुग्ण सापडत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी डॉ. शर्मा यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सूचना दिल्या होत्या. या बैठकीत उपायुक्तांसह स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

लसीकरणात हरघर दस्तक ही मोहीम प्रभावीपणे राबवीत असताना आता घरोघरी जाऊन चाचण्या सुरू करण्याचे बैठकीत ठरले आहे. त्यानुसार घोडबंदर भागातील १२ इमारतींमध्ये काही ठराविक मजल्यांवर आज सुरूवात करण्यात आली. यापुढेही ज्या मजल्यावर रुग्ण सापडतील तिथे ही मोहित सुरू राहील अशी माहिती पालिकेतील सुत्रांनी दिली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 thane municipal corporation commissioner bipin sharma covid test buildings sgy
Show comments