शहापूर : भातसा कालव्याला वासिंद जवळ भगदाड पडून मंगळवारी लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले नसले तरी भगदाड पडल्याने कालव्याचे पाणी बंद करण्यात आले असून आता पाण्याअभावी उन्हाच्या तडाख्यात पिके करपून नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. कालव्याला भगदाड पडण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा कालवा आता हानिकारक ठरू लागल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

भातसा धरणापासून ३१ किमी अंतरावर वासिंद गावाजवळ मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उजव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. भगदाड पडलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिके घेतली नसल्याने तेथील पिकांची नासाडी झाली नाही. कालव्याचे पाणी आता बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच कालव्याचे पाणी काही दिवस बंद करण्यात आले होते. आता पुन्हा पाणी बंद करण्यात आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ४० वर्षे जुना झालेल्या भातसा उजवा कालव्याला उंदीर, घुशी आणि खेकड्यानी पोखरून ठेवल्याने पाण्याची प्रचंड प्रमाणात गळती होत असून कालव्याची अत्यंत  दयनीय अवस्था झाली आहे. कालव्याची साफसफाई व दुरुस्तीची कामे वेळोवेळी होत नसल्याने कालव्याला विविध ठिकाणी भगदाड पडून लाखो लिटर पाण्यासह शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Story img Loader