कल्याण : ‘सोनोग्राफी’च्या चुकीच्या अहवालामुळे एका गर्भवतीचा मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित डॉक्टरवर कोनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. अमोल वाणाईत असे ‘सोनोग्राफी’ केंद्रचालक डॉक्टरचे नाव आहे. गर्भवतीच्या मृत्यूची घटना गेल्या वर्षी घडली होती.
कल्याणमधील अश्विनी साळुंखे ही गर्भवती महिला वैष्णवी रुग्णालयात उपचार घेत होती. तिच्यावर योग्य उपचार करण्यासाठी ‘वैष्णवी’तील डॉ. अश्विन कक्कर यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार डॉ. वाणाईत यांच्या केंद्रात ‘सोनोग्राफी’ करण्यात आली होती.