लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील पाणउतार (जेट्टी) जवळील कांदळवन नष्ट करून तेथे मातीचा भराव टाकण्यात येत असल्याचे वृत्त लोकसत्ताने फेब्रुवारीमध्ये दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन पयार्वरण दक्षता मंडळाच्या कार्यकर्तीने महसूल, कांदळवन संरक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्राराची सखोल चौकशी होऊन अखेर कांदळवन नष्ट करून खाडी किनारी मातीचा भराव टाकणाऱ्या अज्ञात भूमाफियांच्या विरुध्द महसूल डोंबिवली विभागाचे मंडल अधिकारी दीपक गायकवाड यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी जमीन महसूल, पर्यावरण संवर्धन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना
Contractor fined Rs 1.5 lakh for poor road work in Andheri
अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा पाणउतार परिसर (जेट्टी) हा एकमेव कांदळवनाचा हरितपट्टा शिल्लक आहे. मोठागाव, कोपर, गणेशनगर भागातील कांदळवन भूमाफियांनी बेकायदा भराव करून, त्यावर चाळी बांधून, वाळू तस्करांनी रेती उपसा करून नष्ट केला आहे. फेब्रुवारीमध्ये देवीचापाडा खाडी किनारी पाणउतार भागात (जेट्टी) पालिका, महसूल विभागाच्या परवानग्या न घेता भूूमाफियांकडून डम्परद्वारे मातीचे भराव टाकण्याचे काम अहोरात्र सुरू करण्यात आले होते. हे भराव टाकण्यापूर्वी या भागातील कांदळवनाची झाडे तोडण्यात आली. काही जाळून नष्ट करण्यात आली.

आणखी वाचा-खड्डे, गणपती आगमन मिरवणुकांमुळे कल्याण-डोंबिवली वाहन कोंडीत

कांदळवनाचा खाडी किनाराचा मोठा भाग मातीचा भराव टाकून नष्ट केला जात असल्याने, याविषयी पालिका, महसूल, पोलीस कोणीही कारवाई करत नसल्याने लोकसत्ताने १४ फेब्रुवारी २०२४ रोजी देवीचापाडा येथील कांदळवनाचा पट्टा भराव टाकून नष्ट केला जात असल्याचे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची गंभीर दखल महसूल, कांदळवन विभागाने घेतली. पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनी या भरावप्रकरणी महसूल, कांदळवन संरक्षण विभागाकडे तक्रारी केल्या.

या तक्रारींची, लोकसत्ताच्या वृत्ताची दखल घेऊन तहसीलदार सचिन शेजाळ, पोलीस, भूमिअभिलेख, कांदळवन विभागाचे अधिकारी, तक्रारदार रूपाली शाईवाले यांनी देवीचापाडा येथील भराव टाकलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. तेथे भराव टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. भराव टाकण्यापूर्वी या भागातील कांदळवन नष्ट केल्याच्या विषयावर तक्रारदार शाईवाले ठाम राहिल्या. कांदळवनाच्या जागेवर भराव टाकल्याच्या विषयावर शासकीय अधिकाऱ्यांचे एकमत झाले. यासंदर्भातचा अहवाल उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांना तहसीलदार शेजाळ यांच्याकडून पाठविण्यात आला.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली

उपविभागीय अधिकारी गुजर, तहसीलदार शेजाळ यांच्या आदेशावरून डोंबिवली विभागाचे मंडल अधिकारी दीपक गायकवाड यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात कांदळवन नष्ट करून भराव टाकणाऱ्या अज्ञात इसमा विरुध्द तक्रार केली. भरावाचे वृत्त लोकसत्तामध्ये प्रसिध्द होताच, त्यानंतर भराव टाकण्याचे काम भूमाफियांनी थांबवले होते. आता हे भराव कोणी टाकले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. कांदळवन, महसूल विभागाकडून झालेल्या या कारवाईमुळे खाडी किनारी मातीचे भराव टाकून बांधकामे करणाऱ्या माफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Story img Loader