ठाणे : बाळकूम येथील एका गृहसंकुलातील घराचा ताबा न दिल्याने बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलातील एका निवृत्त अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार विकासक मंगलप्रभात लोढा, त्यांची मुले अभिषेक आणि अभिनंदन यांच्यासह लोढा बिल्डर्स कंपनीचे सचिव आणि साईनाथ इंटरप्रायजेस, बांधकाम आणि विकास कंपनीचे सचिव आणि संचालकांविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मिरारोड येथे राहतात. त्यांनी तीन वर्षांपूर्वी ठाण्यातील बाळकूम भागात लोढा समूहाच्या एका प्रकल्पात १३०० चौ. फुटांचे घर खरेदी केले होते. ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांना घराचा ताबा देण्यात येणार होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in