डोंबिवली – सार्वजनिक ठिकाणी मद्य, गांजा सेवन करून गैरशिस्त करण्यास प्रतिबंध असताना येथील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री तीन जणांनी वेगळ्या ठिकाणी मद्य, गांजा सेवन करून सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावर गैरशिस्त केल्याने मानपाडा पोलिसांनी या तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

विधानसभा निवडणुकीचा कालावधी सुरू आहे. आदर्श आचारसंहिता सुरू आहे. कायदा आणि सुव्यव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत मानपाडा पोलिसांना गस्त घालत असताना शनिवारी तीन वेगळ्या ठिकाणी तीन जण मद्य सेवन करून, गांजाचे सेवन करून सार्वजनिक रस्त्यावर गैरशिस्त करत असल्याचे आढळून आले.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी
issue in pimpri assembly constituency
गुन्हेगारी, अतिक्रमणे, अनारोग्य आणि प्रदूषण; वाचा कोणत्या मतदारसंघात आहेत ‘या’ समस्या

हेही वाचा – प्रचारात मागे राहाल, पालिकेच्या तिकिटाला मुकाल, एकनाथ शिंदे यांच्याकडून बदलापुरात सर्व पक्षियांची कान उघाडणी

गोळवली भागात राहणारे सागर कसबे हे अंडाबुर्जी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री गोळवली पांडुरंवाडी भागात सागर कसबे हे मद्य सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्त करत असल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिसांना आढळले. त्यांनी सागर यांच्याकडे आपल्याकडे मद्य सेवन करण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली. त्यांनी असा परवाना नसल्याचे पोलिसांना सांगितले. मद्य सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्त केल्याने हवालदार अशोक आहेर यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाने सागर कसबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या एका प्रकरणात, राजेश सरोदे हे रिक्षाचालक गोळवली भागात मद्यपान करून सार्वजनिक रस्त्यावर गैरशिस्त करत असल्याचे मानपाडा पोलिसांच्या गस्तीवरील पोलिसांना आढळले. ते सूचकनाका भीमनगर भागात राहतात. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाने हवालदार अशोक आहेर यांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – कोपरीत शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने, दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण

अन्य एका प्रकरणात, राहुल कसबे हे शिळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर परिसरातील पिसवली भागात आडोशाला सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करत असल्याचे गस्तीवरील पोलिसांना आढळले. ते कल्याण पश्चिम भागात राहतात. ते मजूर आहेत. सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन केल्याने त्यांच्यावर हवालदार नाना चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्य, गांजा सेवन, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर, रस्ते अडवून हातगाडीजवळ ज्वलनशील शेगडी, सिलिंडर लावून खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर डोंबिवली, कल्याणमधील पोलिसांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून जोरदार मोहीम उघडली आहे.