आठवडय़ाला एक हत्या, तर दर तीन दिवसात बलात्काराची घटना
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई-विरार शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गुन्हेगारीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. दर तीन दिवसाला एक बलात्कार, आठवडय़ाला एक हत्या, तर एक दिवसाआड एका व्यक्तीचे अपहरण होत असल्याचे चित्र आहे. गेल्या सात महिन्यांतील आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२० लाखांच्यावर लोकसंख्या गेलेल्या वसई-विरारमध्ये सात पोलीस ठाणी आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. त्यातच पोलीस बळ कमी असल्याने एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीही वाढत आहे. चालू वर्षांत म्हणजे १ जानेवारी ते २१ जुलै २०१६ या सात महिन्यांतील गंभीर गुन्हेगारीची आकडेवारी पाहता गुन्हेगारीचा आलेख वाढत असलेला दिसून येत आहे. गेल्या सात महिन्यांत तब्बल २५ हत्या, ५९ बलात्कार, ३४० चोरी, १७५ अपहरणांच्या घटनांची नोंद झाली आहे. म्हणजेच आठवडय़ाला एक हत्या तर दर तीन दिवसाला एका बलात्काराची नोंद होते. बलात्कार पीडितांमध्ये अल्पवयीन मुलींची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी जास्त आहे.
* वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वाधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद ही तुळिंज पोलीस ठाण्यात झालेली आहे. सर्वाधिक बलात्कार (२४), चोरी (१११) आणि अपहरण (७५) या पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत. वसई पोलीस ठाण्यात सर्वाधिक कमी गुन्हे नोंद झालेले आहेत.
* अनेक बलात्कार संगनमताने झालेले असतात. प्रेमप्रकरणात मुलगी अल्पवयीन असल्याने बलात्काराचा गुन्हा नोंदविला जातो. मुलगी घर सोडून गेली असेल तर तिच्या प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. अल्पवयीन मुले बेपत्ता असल्यास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल होतो.
* शहरात पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे, तसेच साधनसामुग्रीची कमतरता आहे. यापूर्वी प्रत्येक पोलीस ठाण्याकडे अवघे एकच चारचाकी वाहन होते. नुकतीच पालिकेने पोलिसांना सात वाहने भेट दिली आहेत, तर स्वयंसेवी संस्थांकडून पोलिसांना स्वसंरक्षणासाठी हेल्मेट देण्यात आले आहे.
वसई-विरार शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वसईत आणखी तीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव देण्यात आला असून तो अंतिम टप्प्यात असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले, तर मीरा-भाईंदरसह वसई-विरारला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
– शारदा राऊत, पोलीस अधीक्षिका.