बँकेत पैसे भरण्यासाठी जात असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून चोरटय़ांनी त्याच्याकडील २६ हजारांची रोख रक्कम लुटल्याची घटना गुरुवारी सकाळी कल्याण-भिवंडी रोडवर घडली. भिवंडी येथील कोंबडपाडा परिसरातील आकाश अपार्टमेंटमध्ये दीपक मिना राहत असून तो गुरुवारी सकाळी बँकेत पैसे भरण्यासाठी कल्याण-भिवंडी रोडवरून जात होता. त्या वेळी दोघा चोरटय़ांनी त्याला रस्त्यामध्ये अडवून चाकूचा धाक दाखवत रिक्षात बसविले. त्यानंतर त्याच्याकडील २६ हजारांचा ऐवज लुटून नेला.  भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दोघा चोरटय़ांसह रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

कल्याण नाका येथील पुलाजवळील वळणावर ट्रकने पाठीमागून मोटारसायकलला धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात मोटारसायकलवरील कैलास हंकारे आणि त्यांचा चुलत भाऊ अर्जुन हंकारे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रकचालक मोहम्मद हसन शेख याला भिवंडी शहर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कैलास आणि त्यांचा चुलत भाऊ अर्जुन हे दोघे मोटारसायकलवरून कल्याण नाका भागातून जात होते. त्या वेळी त्यांच्या मोटारसायकलला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी कैलास यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader