तरुणाच्या लग्नाचा डाव उधळला
प्रतिनिधी, डोंबिवली
लग्नाचे आश्वासन देऊन अनेक वर्षांपासून तरुणीची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील ३० वर्षीय तरुणाला अखेर शनिवारी ठाण्यात त्याच तरुणीशी लग्न करण्यास सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग पाडले.
खासगी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक या पदावर काम करणाऱ्या या तरुणाचे या तरुणीशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र लग्न करण्यास तो टाळाटाळ करत होता. लग्नाला नकार दिल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याची तंबी या तरुणीने त्याला दिली होती. मात्र तरीही तो लग्न करण्यास तयार नव्हता. त्याचा साखरपुडा दुसऱ्या तरुणीशी झाला होता आणि ३० मे रोजी विवाह होणार होता. याची माहिती पीडित तरुणीला त्याच्या कार्यालयातून समजली. त्यानंतर तिने आक्रमक पवित्रा घेत एका सामाजिक संघटनेच्या मदतीने त्याचा डाव उधळून लावला. त्याचे लग्न याच तरुणीशी करण्यास सामाजिक संघटनेने त्याला भाग पाडले.
या तरुणाने याआधीही २०११मध्ये दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या तरुणीने त्यावेळीही त्याचा हा डाव उधळून लावला होता.

विकासकावर गोळीबार करणारे अटकेत
कल्याण : कांबा येथे विकासक सुनील धुमाळ यांच्यावर गोळीबार करणाऱ्या चार संशयितांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली असून पांडुरंग संते, अनुप गोंधळे, गणेश म्हस्कर, महेश पाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी धुमाळ हे आपल्या वाहनाने मध्यरात्रीच्या वेळेस मुरबाड रस्त्याने घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या समोरून दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी धुमाळ यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यातून ते बचावले होते. जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करून त्यांनी संशयितांची नावे पोलिसांना दिली होती.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

बांगलादेशी नागरिकांना अटक
कल्याण : कोन गावाच्या हद्दीत राहण्यासाठी आलेल्या सहा बांग्लादेशी नागरिकांना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या नागरिकांकडे कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे नसून ते बेकायदेशीररीत्या भारतात घुसून मुंबईपर्यंत पोहचल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

व्यापाऱ्याची हत्या
भिवंडी : कासारआळी येथील आनंद सागर इमारतीमध्ये राहणारे व्यापारी दिलीप कुंदनमल जैन (४०) यांचा रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घरात घुसून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. दिलीप जैन आणि त्यांची पत्नी घरामध्ये झोपलेले होते. पहाटे त्यांच्या पत्नीला घराचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच तीनजण घरात शिरले आणि त्यांनी साडीने त्यांचे हात आणि तोंड बांधले आणि दिलीप यांच्या डोक्यावर लोखंडी पट्टीने प्रहार करून त्यांचा खून केला. त्यानंतर घरातून सव्वा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या तिघांचा शोध घेत आहेत.

सोनसाखळी चोरी
कल्याण : उल्हासनगर येथील कुर्ला कॅम्प परिसरात राहणाऱ्या निना मुखर्जी या महिलेच्या गळ्यातील २० हजार रुपयांची सोनसाखळी चोरटय़ांनी चोरली. सकाळी दूध घेऊन घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोर सोनसाखळी खेचून पसार झाले.

सनी लिओनीच्या विरोधात निदर्शने
कल्याण : बॉलीवूडची अभिनेत्री सनी लिओनी ही अश्लिलतेचा प्रचार करत असल्याचा अरोप करून तिच्या संकेतस्थळावर बंदी आणावी आणि तिला भारतात प्रवेश नाकारावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे कल्याणमधील शिवाजी चौकात निदर्शने केली. सनीच्या विरोधात राज्याच्या विविध पोलीस ठाण्यात समितीतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल होऊन पोलीस तिच्या अटकेची तसेच तिचे संकेतस्थळ बंद करण्याची कारवाई करीत नसल्याने समितीतर्फे शासनावरील दबाव वाढवण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली आहेत.

डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली : कचोरे गावात राहणाऱ्या सनम शेख यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी २५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र व २० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. सनम शेख या नाशिकला गेल्या होत्या, तर त्यांचा मुलगा कुमार आतिक हा रिक्षा चालविण्यास गेला होता. त्यामुळे घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरटय़ांनी हा डाव साधला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्व्ॉपकार्ड मशीन चोरीला
डोंबिवली : स्टार कॉलनीतील रुपश्री डिझायनर सारी स्टुडियो या दुकानात अर्थ पेमेंट अ‍ॅड सोल्युशन्स या कंपनीतून आलेल्या मनोज नावाच्या व्यक्तीने दुकानातील स्व्ॉपकार्ड मशीनची ३ मे रोजी चोरी केली. मशीनमधील सॉफ्टवेअर अपडेट करावयाचे असून ती कंपनीत घेऊन जावे लागेल, अशी बतावणी करून मशीन चोरून नेल्याची तक्रार केयुर मनोज रामानी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू अटकेत
ठाणे : ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर उर्फ सिद्धू अभंगे (२४) याला ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेने दोन दिवसांपूर्वी अटक केली असून तो कोपरी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरारी होता. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. सिद्धू संघटीत गुन्हेगारीशी संबंधित असून त्याच्यावर ठाण्यातील एका बडय़ा राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त असल्याची चर्चा शहरात आहे.
कोपरी भागात सिद्धू राहत असून जानेवारी महिन्यात त्याने पूर्ववैमनस्यातून एकावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर तो कोपरीतून पसार झाला होता. या गुन्ह्यात तो फरारी असल्याने पोलिसांची पथके त्याचा माग काढत होती. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. कल्याण परिसरात सिद्धू येणार असल्याची माहिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार कल्याण परिसरात सापळा रचून पथकाने त्याला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, चोरी यांसारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिली.

Story img Loader