पाच पेक्षा अधिका नागरिकांनी जमावाने एकत्र येऊ नये असा ठाणे पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश असताना त्या आदेशाचा भंग केला म्हणून शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्यासह २२ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवरात्रोत्सवातील नऊ दिवस व्यसनमुक्ती अभियान ; डोंबिवलीतील डाॅक्टरचा उपक्रम

जिल्हाप्रमुख विजय सा‌ळवी यांना साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून दोन वर्षापासून तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिशी विषयी साळवी यांची बाजू मांडण्यासाठी शहरप्रमुख सचीन बासरे यांच्यासह ६० शिवसैनिक रामबाग दत्त मंदिर येथे मंगळवारी सकाळी जमले होते. आपण मनाई आदेशाचा भंग केला आहे, असे महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना सांगितले. ते जमावाने महात्मा फुले पोलीस ठाणे येथे पायी आले. शहरप्रमुख सचीन बासरे, माजी आ. रुपेश म्हात्रे, उपनेते इरफान शेख, रवी कपोते, शरद पाटील, विजया पोटे, ॲड. जयेश वाणी यांच्या शिष्टमंडळाने साहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांची भेट घेऊन विजय साळवी यांची बाजू तेथे मांडली. साळवी यांच्यावरील सर्व गुन्हे राजकीय स्वरुपाचे आहेत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. या कारवाईचा विचार करण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांना केली.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील २७ गावांमधील २७ विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल

तेथून बाहेर पडल्यानंतर मुरबाड रस्त्यावरील आंबेडकर उद्यान येथे बंड्या साळवी यांनी शिवसैनिकांच्या उपस्थितीत आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घातला. तेथे साळवी यांनी आपल्यावर राजकीय दबावापोटी कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या कारवाईला आपण न्यायालयात आव्हान देणार आहोत, असे सांगितले. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. मनाई आदेशाचा भंग केला म्हणून बंड्या साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर हवालदार साहेबराव मुठे यांच्या तक्रारी वरुन महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सा‌ळवी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crimes against 22 shiv sena workers including kalyan shiv sena district chief vijay salvi amy