लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध आहे. अशाही परिस्थितीत येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिसांनी तीन वेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या व्यक्तिंना पकडून त्या तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

case registered against who sold clay pots by blocking road in kalyan
कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
varun patil bjp kalyan
भाजपचे कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरूण पाटील यांची हकालपट्टी
passenger was robbed by thieves on the skywalk of Kalyan railway station
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर प्रवाशाला चोरट्यांनी लुटले
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
thane police
डोंबिवलीतील दोन जण पिस्तुलसह कल्याणमध्ये अटक
Kalyan, Dombivli rebels, Kalyan, Dombivli, campaigning,
कल्याण, डोंबिवलीतील बंडखोरांचे पाठीराखे प्रचारातून गायब; बंडखोर, अपक्षांचा एकला चलो रे मार्गाने प्रचार
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

शहाड जवळील म्हारळ रस्त्यावरील सेंच्युरी रेयॉनच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील भागात सार्वजनिक रस्त्यावर एका टँकरच्या आडोशाला बसून नेमसिंग राठोड हे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना गस्तीवरील पोलिसांना आढळून आले. ते म्हारळ गाव भागात राहतात. दुसऱ्या एका प्रकरणात कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील नीलम गेस्ट हाऊस मागील गल्लीत ताहीर सय्यद यांना गांजाचे सेवन करताना पोलिसांनी पकडले आहे. ते रिक्षा चालक आहेत. ते नेवाळी नाका भागात राहतात.

आणखी वाचा-जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ, २० दिवसांत ७३ हजार मतदारांची भर

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ बैजनाथ सिंग हे गांजाचे सेवन करत होते. ते चिंचपाडा भागात राहतात. ते मजूर आहेत. गस्तीवर असताना पोलिसांना ते आढळून आले. महात्मा फुले पोलीस ठाण्यातील हवालदार महेंद्र मंझा, श्रीधर वडगावे यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात या तिन्ही व्यक्तींविरुध्द अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अलीकडे कल्याण, डोंबिवली परिसरात सार्वजनिक ठिकाणी गावठी मद्य आणि गांजा सेवनाचे प्रमाण वाढले आहेत. गांजाची तस्करी करणारे काही पुरवठादार शहराच्या विविध भागात सुप्तपणे सक्रिय असल्याच्या तक्रारी आहेत.

Story img Loader