टिटवाळा-मांडा येथील सांगोडा रस्त्यावरील बेकायदा चाळींमधील रहिवाशांनी १४ लाख ६८ हजार रुपयांची वीज चोरी केली. लाखो युनिटचा नियमबाह्य वापर केला. रहिवाशांना विहित मुदत देऊनही चोरीचे वीज देयक दंडासह न भरणाऱ्या ४७ रहिवाशां विरुध्द महाराष्ट्र विद्युत कायद्याने महावितरणतर्फे मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>बदलापूरः स्थानक परिसरातील गाळ्यांवर धडक कारवाई, पालिकेने जमिनदोस्त केले ३५ अनधिकृत गाळे

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
excise department registered 226 cases of illegal liquor traffic in suburbs
अवैध मद्य वाहतुकीबद्दल उपनगरात २२६ गुन्हे दाखल
Pune Drunk drivers, proposal to suspend licenses,
पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव

महावितरणच्या टिटवाळा भागात मांडा शाखा कार्यालयांतर्गत विनायक कॉलनी, सांगोडा रोड, साईबाबा कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, साईप्रसाद चाळ, वैष्णवी चाळ आदी भागात महावितरणच्या पथकाने ग्राहकांच्या वीज जोडण्यांची तपासणी केली. सांगोडा रस्त्यावरील बेकायदा चाळींमध्ये मूळ वीज सेवा वाहिनीला छेद देऊन ती वाहिनी वीज मीटरमध्ये जाण्यापूर्वीच त्या वाहिनीवरुन वीज पुरवठा सर्वच रहिवाशांनी चोरुन वीज पुरवठा घेतला असल्याचे महावितरणच्या विशेष पथकाच्या निदर्शनास आले. काहींनी वीज मीटरची छेडछाड करुन वीज पुरवठा घेतला होता.

हेही वाचा >>>ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव आता अंबरनाथमध्ये; पालिकेकडून बांधकामाची निविदा जाहीर, खेळाडूंना अंबरनाथमध्ये मिळणार सुविधा

पाच हजार रुपये वीज देयकापासून ते एक लाखापर्यंत रकमेच्या वीज चोऱ्या या रहिवाशांनी केल्या आहेत. या रहिवाशांनी पथकाने तातडीने वीज देयक दंडासह भरण्याच्या सूचना केल्या होत्या. एकाही रहिवाशांनी दोन महिन्याच्या कालावधीत वीज देयक भरणा केला नाही. या रहिवाशांनी तशी पूर्वसूचना देण्यात आली होती. त्याचीही दखल रहिवाशांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर महावितरणचे साहाय्यक अभियंता नीलेश महाजन यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली: सामान्य शाळांमधील मूलभुत सुविधांसाठी लोकसहभाग महत्वाचा; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता गणेश पवार, साहाय्यक अभियंता नीलेश महाजन व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.