कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत खड्डेच काय. प्रशासनाचा एकूण कारभाराच धेडगुजरी पध्दतीने सुरू आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. या सगळ्या अराजकतेचे चटके खड्ड्यांच्या माध्यमातून नागरिकांना सोसावे लागत आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेचा एकूण कारभारच ऑटो मोडवर (स्वयंचलित ) सुरू असल्याची टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी रविवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आ. पाटील यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख पालिकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींवर होता. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रत्येक डांबराच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रिक्षा, दुचाकी चालक, प्रवाशांना पाठ, मणके दुखीचे आजार सुरू झाले आहेत. तरीही प्रशासन खड्डे भरणीची कामे करत नाहीत याचे आश्चर्य वाटते.

हेही वाचा >>>देशाबाबत वाईट गोष्टींना जास्त प्रसिद्धी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

खड्डे भरणीच्या निविदा प्रक्रियात ४० टक्के लाच पालिकेत टेबलाखालून वाटावी लागते. उरलेल्या ६० टक्क्यात ठेकेदार कशासाठी गुणात्मक दर्जा राखून खड्डे, रस्ते बांधणीची कामे करील, असा प्रश्न आ. पाटील यांनी केला. ठाणे, नवी मुंबई ही कल्याण डोंबिवली जवळील शहरे आहेत. या शहरांमध्ये एवढा खड्ड्यांचा प्रश्न नाही. मग कल्याण डोंबिवली पालिकेच्या मागे दरवर्षी पावसाळ्यात हे खड्ड्यांचे दृष्टचक्र कशासाठी. हे कधी तरी थांबणार आहे की नाही. एकीकडे स्मार्ट सिटीच्या घोषणा करायच्या आणि त्याच शहरात लोकांना चांगले रस्ते नाहीत ही किती शरमेची बाब आहे, असे आ. पाटील म्हणाले.

हेही वाचा >>>जैतापूर आणि नाणार या प्रकल्पांचा विरोध समजून घेणे आवश्यक; जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर

ठाणे, नवी मुंबई पालिकांचे आयुक्त दणकेबाजपणे काम करत आहेत. बेशिस्तीने वागणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांवर निलंबन, दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. कडोंमपा हद्दीत फक्त कारवाईच्या वल्गना केल्या जातात. प्रत्यक्षात कोणतीही कृती केली जात नाही. त्याचा गैरफायदा ठेकेदार, अधिकारी उचलत आहेत, असे आ. पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली पालिकेचा एकूण कारभार रामभरोसे सुरू आहे. निसर्ग सांगेल तशी त्याची वाटचाल स्वयंचलित पध्दतीने सुरू आहे, अशी खोचक टीका आ. पाटील यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism of mns pramod patil regarding the administration of kalyan dombivli municipal corporation amy
Show comments