लक्ष्मी पूजन अगदी एक दिवसावर येऊन ठेपले आहे. तसेच यंदाची दिवाळी ही करोना काळानंतरची निर्बंधमुक्त दिवाळी असल्याने नागरिकांकडून अगदी उत्साहात दिवाळीची खरेदी केली जात आहे. गेल्या दोन दिवसांप्रमाणे शनिवारीसुद्धा ठाण्यातील स्थानक परिसर, जांभळी नाका येथे ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा- कल्याण पश्चिमेत औद्योगिक ग्राहकांकडून १७ लाखांची वीजचोरी; ४ लाख ८० हजारांचा दंड

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही

गेल्या दोन दिवसांपासून नागरिक दिवाळीच्या खरेदी करिता बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी करताना दिसून येत आहे. ग्राहकांकडून विविध शोभेच्या वस्तू, विद्युत रोषणाई, तोरणे तसेच कपडे, मिठाई यांसह विविध गोष्टींची मोठी खरेदी केली जात आहे. येत्या सोमवारी येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणाऱ्या विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी ठाण्यातील गावदेवी परिसर, जांभळी नाका यांसारख्या बाजारपेठ शनिवारी गजबजून गेल्या. बाजारपेठांमध्ये झालेल्या या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा- डोंबिवली, कल्याणमध्ये दुचाकी चोरणारा सराईत चोरटा अटकेत; चोरीमध्ये अल्पवयीन मुलाचा सहभाग

तर सोनसाखळीचोर, मोबाईलचोर, पाकीटमार यांसारख्या चोरांकडून सावध राहण्याचे तसेच हा ऐवज सांभाळून ठेवण्याच्या सूचना पोलिसांकडून ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात येत आहे. तर धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने, ग्राहकांनी शनिवारी ठाण्यातील विविध सराफा दुकानांमध्ये देखील मोठी गर्दी केली होती.

Story img Loader