कल्याण: ‘द केरला स्टोरी’ हा चर्चेचा विषय ठरलेला चित्रपट पाहण्यासाठी गुरुवारी कल्याणमध्ये तरुणी, महिलांनी चित्रपट गृहात गर्दी केली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक महिलांनी लव्ह जिहाद सारख्या प्रकारांना बळी पडणार नसल्याची शपथ घेतली.

कल्याण विकास फाऊंडेशन, माजी आ. नरेंद्र पवार, भाजप कार्यकर्त्या आणि फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांनी महिलांसाठी या मोफत चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन केले होते. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींचे कशाप्रकारे लैंगिक शोषण केले जाते हे महिला, विद्यार्थीनी, मुलींना योग्यवेळी कळावे या उद्देशातून हा मोफत चित्रपट पाहण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले होते, असे संयोजक हेमलता पवार यांनी सांगितले.

हेही वाचा… ठाणे : महावितरणच्या कार्यालयाला आग

चित्रपटाला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम घोषणांनी चित्रपट गृह दणाणून सोडले. यावेळी डाॅ. उपेंद्र डहाके यांच्यातर्फे ‘लव्ह जिहाद एक षडयंत्र’ पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी कल्याण विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी कल्पेश जोशी, सदा कोकणे, प्रवीण हेंद्र, गणेश काळण, राहुल भोईर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, समृध्दी देशपांडे, मनीषा केळकर, प्रिती दीक्षित, जयश्री देशपांडे, विवेक गायकर, रत्ना कुलथे, इस्काॅनचे सदस्य उपस्थित होते.

Story img Loader