डोंबिवली: नववर्षानिमित्त डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरात भक्तांनी विशेषता तरुण, तरुणींनी दर्शनासाठी रविवारी गर्दी केली होती. पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांच्या मंदिरासमोर रांगा लागल्या होत्या. नेहरु मैदान दिशेेने या रांगा लागल्या होत्या. नववर्षानिमित्त श्री गणेश मंदिरात भक्तांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक यांनी मंदिरात दर्शन रांगेचे नियोजन केले होते.
हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीत मंडप साहित्याला आग, अनोळखी इसमाने आग लावली
प्रदक्षिणा फेरी, प्रसाद व्यवस्थेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी रात्रीपासून भक्तगण मंदिरात दर्शनासाठी येत होते. दर्शनासाठी येणाऱ्यांमध्ये तरुण, तरुणींचा सर्वाधिक सहभाग होता. कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातून तरुण भक्तगण दर्शनासाठी आले होते. मंदिर परिसरात वाहनतळाची व्यवस्था नाही. दर्शनासाठी येणाऱ्या बहुतांशी भाविकांनी नेहरु रस्ता, फडके रस्ता, नेहरु मैदान रस्ता भागात दुचाकी.
हेही वाचा >>> ठाण्यात ६५९ मद्यपी वाहन चालक आणि सहप्रवाशांवर कारवाई
चारचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी केल्याने या रस्त्यांवर वाहन कोंडी झाली होती. मंदिर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना आपली वाहने सोसायटी आवारात आणताना दमछाक होत होती. मंदिर व्यवस्थापनाने मात्र वाहतूक व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन केले आहे. काही ठिकाणी बांबूंचे अडथळे उभे केले आहेत, असे सांगितले. आतापर्यंत दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवरील गर्दी आता नववर्ष दिनीही दिसू लागली आहे. यामध्ये तरुणांचा जल्लोष सर्वाधिक दिसून येत आहे.