ठाणे – पावसाळ्याला सुरुवात होताच ठाण्यातील बाजारात रेनकोट, छत्री विक्रिसाठी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा रेनकोट आणि छत्र्यांमध्ये वैविध्य पाहायला मिळत असून त्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा बाजारात महिलांसाठी खास नक्षिकाम असलेली पारदर्शक अशी मोठ्या आकरातील छत्री विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ही छत्री खरेदी करण्यासाठी तरुणींची गर्दी होत आहे, अशी माहिती ठाण्यातील एका विक्रेत्याने दिली.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसात भिजावे लागू नये म्हणून नागरिकांनी छत्री, रेनकोटीची खरेदी सुरू केली आहे. बाजारात रेनकोट, छत्री, घरांवर टाकायला ताडपत्री विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात गर्दी होऊ लागली आहे. यंदा बाजारात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या रेनकोट आणि छत्री मध्ये वैविध्य आले आहेत. परंतू, यंदाच्या वर्षी या साहित्यांमध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Nashik will be connected to the proposed Vadhvan port
प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार
new york city charges congestion fee peak-hour traffic
न्यूयॉर्कमध्ये वाहनचालकांना द्यावे लागणार ‘वाहतूक कोंडी शुल्क’! काय आहे ‘कंजेशन प्रायसिंग’? मुंबईतही अमलात येऊ शकते?
Mumbai dust latest news in marathi
दोन महिन्यांमध्ये मुंबईतील पीएम २.५ धूलीकणांमध्ये वाढ

हेही वाचा >>>फिरत्या शाळेमुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली; ४५० मुलांचा यंदा शैक्षणिक प्रवेश

यंदा बाजारात लहान मुलामुलींसाठी टॉम आणि जेरी, डोरेमॉन, डिझनी कार्टून्स, छोटा भीम, बॅटस् मॅन असे विविध कार्टून्सचे रेनकोट उपलब्ध आहेत. यामध्ये हलक्या दर्जाचे रेनकोट २५० रुपयांपासून ते ३६० रुपयांपर्यंत तर, चांगल्या दर्जाचे रेनकोट ४०० ते ७०० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहेत. मागील वर्षी हलक्या दर्जाचे रेनकोट २२० ते ३४० रुपयांपर्यंत तर, चांगल्या दर्जाचे रेनकोट ३८० ते ६६० रुपयांपर्यंत विक्री केले जात होते. तर, लहानमुलांच्या छत्र्यांची विक्री २५० ते ३०० रुपयांपर्यंत केली जात आहे. पुरुष आणि महिलांसाठी देखील छत्र्या आणि रेनकोटमध्ये विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. यात जॅकेट, फुलपाखरुच्या आकारासारखे, लांबलचक आणि मिडी सारखे असे विविध प्रकारचे रेनकोट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक रेनकोटचे दर हे वेगवेगळे आहेत. यात, जॅकेट पद्धतीचा हलक्या दर्जेचा रेनकोट ३०० ते ५०० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहे. हे रेनकोट मागील वर्षी २५० ते ४५० रुपयापर्यंत विक्री केले जात होते. तर, उत्तम दर्जाचे रेनकोट सध्या ६०० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहेत. गेल्यावर्षी हे रेनकोट ५५० ते ८०० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत होते. या रेनकोटचे कापड चांगले असून ते जास्त काळ टिकते, यामुळे हे रेनकोट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा सर्वाधिक कल असतो.

हेही वाचा >>>अतिधोकादायक इमारतींचा पाणी, वीज पुरवठा खंडीत करा; ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

फुलपाखरु आकारासारखे असणारे रेनकोट हे प्रथमच बाजारात विक्रिसाठी उपलब्ध झाले आहेत. या रेनकोटची विक्री ५०० ते ७०० रुपयांपर्यंत केली जात आहे. या रेनकोटची महिला वर्गांकडून सर्वाधिक खरेदी केली जात आहे. लांबलचक आणि मिडी सारखे असणारे हलक्या दर्जाच्या रेनकोटची विक्री गेल्यावर्षी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत केली जात होती. तर, चांगल्या दर्जाच्या रेनकोटची विक्री ६०० ते ८०० रुपयांपर्यंत केली जात होती. या रेनकोटच्या दरातही यंदा वाढ झाली असून हलक्या दर्जाचे रेनकोट ३५० ते ४५० रुपयांपर्यंत तर, चांगल्या दर्जाचे ६५० ते ८५० रुपयांपर्यंत केली जात आहे. त्यासह, मागील वर्षी २५० ते ५०० रुपयांपर्यंत विकण्यात येणाऱ्या हलक्या दर्जाच्या छत्र्या यंदा ३०० ते ५५० रुपयाने तर, ६०० ते ८०० रुपयांपर्यंत चांगल्या दर्जाच्या छत्र्यांची विक्री केली जात आहे.

महिलांची पारदर्शक नक्षिकाम केलेल्या छत्रीला पसंती

यंदा बाजारात महिलांसाठी खास नक्षिकाम असलेली पारदर्शक अशी मोठ्या आकरातील छत्री विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या छत्रीची विक्री ५०० रुपये ते ६०० रुपयांपर्यंत करण्यात येत आहे. विशेषकरुन तरुण वयोगटातील महिला वर्गाकडून ही छत्री खरेदी करण्यास पसंती मिळत असल्याचे ठाण्यातील खारकर आळी परिसरातील विक्रेते अखिलेश मिश्रा यांनी सांगितले.

Story img Loader