ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याणमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आपली संस्कृती जोपासण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. हीच बाब लक्षात घेऊन कल्याणातील सी.के.पी. सभेच्या वतीने यंदाच्या वीकेण्डला ‘फूड फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने खवय्यांना खास सी.के.पी शैलीतील चिकन वडे, खिमा, मटन बिर्याणी चाखता येणार आहे. कल्याण आणि परिसरात पसरलेली थंडीची झालर आणि त्यात महोत्सवाच्या निमित्ताने मिळणारी खमंग मांसाहाराची पर्वणी..हा दुहेरी आनंद लुटण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कल्याणातील सी.के.पी. सभेच्या फूड फेस्टिव्हलला भेट द्यायलाच हवी.
’कधी : शुक्रवार २५ ते रविवार २७ डिसेंबर
’कुठे : यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राऊंड), कर्णिक रोड, कल्याण (प.), वेळ : सायंकाळी ५.३० ते रात्री १०

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘चुप छुप के’
कल्याणातील काही कलाकार एकत्र आले आणि त्यांनी साकारली एक वेगळी कलाकृती : ‘चुप छुप के.’ सहकुटुंब पाहायला हवे असे हे नाटय़ ही तरुण मंडळी कल्याणातील रसिकोंच्या आग्रहास्तव येत्या रविवारी म्हणजेच २७ डिसेंबर रोजी कल्याणकरांसमोर सादर करणार आहेत. मंदार अंतुरकर, हेमंत दळवी, निनाद वैशंपायन, सागर पाटणकर, ऋचा महाजन आदी सर्व कलाकार मंडळी या कार्यक्रमात आपली नाटय़ कला सादर करणार आहेत.
’कुठे : आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प.)
’कधी : २७ डिसेंबर, रात्री ८.३०

नाताळानिमित्त बालरंगोत्सवाची मेजवानी
वेध अ‍ॅिक्टग अकादमी यांच्या वतीने नाताळानिमित्त बालदोस्तांसाठी विनोदी नाटकांची मेजवानी असलेला बालरंगोत्सव २०१५ चे आयोजन २५ डिसेंबरला करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर, डोंबिवली (पू.) येथे हा रंगोत्सव होणार आहे. यात बालनाटय़ संमेलनात गाजलेली नाटके तसेच बालनाटय़ स्पर्धा आणि महोत्सवांमधून नावाजलेली पारितोषिक विजेती धम्माल विनोदी बालनाटय़े यावेळी सादर केली जाणार असून ४० बाल कलाकारांनी सजलेली चार दर्जेदार नाटके होणार आहेत. शिरीष लाटकर, ज्योतिराव कदम व योगेश सोमण अशा दिग्गज लेखकांची झेप, द विगीन, जनसेवा हीच ईश्वरसेवा, कमाल आहे ही नाटके सादर होणार असून या नाटकांचे दिग्दर्शन मधुरा ओक, वृषांक कवठेकर, नीलम घैसास, कविता चिपळूणकर यांचे आहे.
’कधी : शुक्रवार, २५ डिसेंबर वेळ- सकाळी ११ वाजता.
’कुठे : सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर, डोंबिवली (पू.)

कोकणातील ‘देवदर्शन’
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे देव रवळनाथाला पडलेले एक सुंदर स्वप्न. देवाने उदारहस्ताने या जिल्ह्य़ाला भरभरून निसर्ग दिला, अशी कोकणवासीयांची ठाम श्रद्धा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोकणचे वैभव म्हणून मिरवतो. कोकणवासीयांचा देव आणि देवचार यावर विश्वास. स्वत: अध्र्या वेशात राहील पण गावच्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा झाल्यास मालवणी कधी हात आखडता घेत नाहीत, असे वर्णन केले जाते. कोकणातील खेडय़ात जुनी देवळे कात टाकू लागली असून एकाहून एक देखणी मंदिरे निर्माण होत आहेत, नवीन तीर्थक्षेत्रे तयार होत आहेत. या नव्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविण्यासाठी ठाणे पूर्वेकडील खुले कलादालन येथे ‘सिंधू-तीर्थ’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील निसर्ग, जनजीवन, विविध स्थळे आणि कोकणी माणूस जेथे नतमस्तक होतो त्या देवळांची १५० हून अधिक छायाचित्रे या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहेत.
’कधी : २५,२६ आणि २७ डिसेंबर, वेळ-सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत.
’कुठे- खुले कलादालन, अष्टविनायक चौक, ठाणे (पूर्व.)

बॅले नृत्यधारा
युवा पिढीचा नृत्याबद्दलचा नवा कल पाहता ठाण्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. पाश्चात्त्य देशातील कपडे, गाडय़ा, खाद्यपदार्थ आदींचा कायमच आपल्या रोजच्या आयुष्यात वापर करत आसतो. परंतु आता ठाणेकरांच्या आठवडय़ाची रंगत वाढवण्याकरिता येथील गोखले रोड परिसरातील डिफरंड डान्स स्ट्रोक स्टुडियोतर्फे रविवारी बॅले नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सालसा’ हा पाश्चिमात्य नृत्य प्रकार गेल्या काही वर्षांपासून भारतात चांगलाच लोकप्रिय होतो आहे. फिटनेस राखण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या नृत्य प्रकारात याचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो. असे असताना रविवारी ठाण्यात ‘बॅले नृत्यधारा’ आयोजित करून डीएसएसने तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सहभाग घेण्यासाठी संपर्क-९८२१४५६०२६.
’कधी : रविवार, २७ डिसेंबर वेळ-सकाळी ७ ते ९.
’कुठे- वासुदेव सदन, कलानिधीजवळ, गोखले रोड, ठाणे(प.)

अंकित तिवारी लाइव्ह.

तरुणाईच्या मनामनावर राज्य करणाऱ्या गायकांच्या यादीतील मुख्य नाव म्हणजे ‘अंकित तिवारी.’ त्यांनी कमी वयामध्ये आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मानाचा ताबा मिळवला आहे. ठाणेकरांच्या वीकेण्डची रंगत वाढविण्यासाठी तो ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे. आशिकी-२ आणि एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांची गाजलेली गाणी अंकित तिवारी यांनी गायली आहेत.
संपर्क-९३२४४५५४४४.
’कधी : रविवार, २७ डिसेंबर वेळ- दुपारी १२.३०.
’कुठे- हायलँड पार्क, कोळशेत रोड, ठाणे(प.)

रफी यांच्या गाण्यांची मैफल
महम्मद रफी क्लबतर्फे पद्मश्री महम्मद रफी यांच्या ९१ व्या वाढदिवासाच्या निमित्ताने त्याच्या आठवणी पुनर्जीवित करण्यासाठी ‘सजना साथ निभाना’ हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पाश्र्वगायक महम्मद रफी यांची सदाबहार गाणी या मैफलमध्ये सादर होणार आहेत.
’कधी : रविवार, २७ डिसेंबर, सायंकाळी ७ वाजता.
’कुठे : टाऊन हॉल, सेंट्रल हॉस्पिटल रोड, उल्हासनगर, ठाणे.

‘यम्मी’ केकची कार्यशाळा
नववर्ष स्वागतासाठी मोठय़ा उत्साहात तयारी सुरू झाली आहे. सण साजरे करण्यामध्ये चंगळ असते ती खाण्याची. नाताळानिमित्त खास वैविध्यपूर्ण असे ‘केक’ बनवण्याची कार्यशाळा कोरम मॉल व्यवस्थापनाने आयोजित केली आहे. बुधवार, ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी जंक्शनजवळ, ठाणे(प.) येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिभेला पाणी आणणारे असा कॅ्रनबेरी रॅसिन केक, इटालियन लाइम केक आणि अ‍ॅल्मण्ड चॉकलेट केक या केकच्या प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
’कधी : बुधवार, ३० डिसेंबर वेळ-दुपारी ३ ते रात्री ८. कुठे- कोरम मॉल, ठाणे(प.)
कल्याणात चित्र-छायाचित्रांचे प्रदर्शन
कल्याणातील प्रकृति कला मंचतर्फे येत्या वीकेण्डला चित्रे-छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पोर्टेट’ आणि ‘लाइफ स्टाइल’ आदी विषयांवर आधारित प्रख्यात चित्रकार कै. नेत्रा साठे, श्रीधर केळकर, गुलशन आचारी यांच्या कलाकृती ठेवण्यात येणार आहेत.
’कुठे : गायन समाजाचे सभागृह, टिळक चौक, कल्याण (प.)
’कधी : २५ ते २७ डिसेंबर, वेळ : सकाळी १०.३० ते रात्री ८.३०