लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: बदलापूर आणि अंबरनाथ शहरात वाढलेल्या विजेच्या मागणीनंतर विजेचे व्यवस्थापन व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर चक्राकार पद्धतीने भार नियमन केले जाईल, असा आशय असलेले संदेश शुक्रवारी महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र असे कोणतेही भार नियमन केले जाणार नसल्याचे महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आले. बदलापुरात विजेचे भार नियोजन केले असून कमी भार असलेल्या भागातून विजेचे नियमन केले असल्याने भार नियमन टळले असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील विजेची मागणी गेल्या काही वर्षात वाढली आहे. मात्र विजेचा पुरवठा तितकाच असल्याने पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. वाढलेली उष्णता आणि त्यापासून दिलासा मिळवण्यासाठी पंखे, वातानुकूलित यंत्रणा यांचा वापर वाढला. विजेच्या मागणीमुळे अनेकदा भार वाढून काही भागात वीज पुरवठा खंडित होतो. परिणामी याचे नियमन करण्याची गरज असल्याचे सांगत रात्रीच्या सुमारास काही भागात चक्राकार पद्धतीने भार नियमन केले जाणार असल्याचे संदेश महावितरण अभियंत्यांनी प्रसारित केले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

आणखी वाचा-वाढत्या उष्म्यात अघोषित भारनियमनाचेही चटके, ठाण्याच्या अनेक भागांत वारंवार वीजपुरवठा खंडीत  

बदलापूर आणि अंबरनाथच्या भागात हे भर नियमन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शुक्रवार, शनिवार आणि रविवार तीनही दिवस विविध कारणामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे भार नियमन सुरू झाल्याचा भ्रम निर्माण झाला. मात्र तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची स्पष्टोक्ती महावितरण जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच बदलापूर शहराच्या दोन्ही भागातील विजेची मागणी लक्षात घेता ही मागणी पूर्ण करण्यासाठी इतर उच्चदाब वाहिनीवर काही भार फिरवण्यात आल्याची माहिती महावितरण अभियंत्यांनी दिली आहे. त्यामुळे तूर्तास भार नियमन करण्याची गरज नसल्याची माहिती देण्यात आली आहे. परिणामी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील भार नियमन टळले आहे. तसेच येत्या कामात तापमानात घट झाल्यास मागणीतही घट अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या काळात सुद्धा भार नियमन करण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

लपंडाव टाळा

विजेचे भारनियमन टळले असले तरी सध्या दोन्ही शहरातील काही भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येते आहे. ऐन उन्हाळ्यात वीज गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण होतात. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करू नये, अखंडित वीज द्यावी अशी मागणी होते आहे.