डोंबिवली- गणेशोत्सवाच्या काळात खाडीत होणाऱे गणपती विसर्जन भाविकांना दूरवरुन पाहता यावे म्हणून देवीचापाडा येथील खाडी किनारी असलेली जुनाट खारफुटीची झाडे काही अज्ञात व्यक्तिंनी तोडल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खाडी किनारच्या गणपती विसर्जन व्यवस्थेचे नियोजन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनावर होते. परंतु, पालिका अधिकाऱ्यांनी असा कोणताही प्रकार आपण केला नाही असे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा <<<Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

हेही वाचा <<<एसी लोकलचा विषय पुन्हा पेटणार? वातानुकूलित लोकल सुरु करण्याबाबत बदलापूर स्थानकात सूचना फलक

डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे खाडी किनाऱ्यावरुन खाडीत उतरण्यासाठी ५० फुट उताराची जेट्टी आहे. या जेट्टीवरुन अनेक नागरिक खाडीच्या आतील भागात जातात. गणेशोत्सव काळात मोठे गणपती या जेट्टीवरुन थेट खाडीच्या मध्यभागी नेणे शक्य होते. त्यामुळे डोंबिवलीतील अनेक खासगी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे देवीचापाडा येथे गणपती विसर्जनाला पसंती देतात. या जेट्टीच्या दोन्ही बाजुला खारफुटीची जुनाट मोठी झाडे आहेत. खारफुटीच्या या भागातील जंगलामुळे याभागात विविध प्रकारची जैवविविधता आढळून येते. विविध प्रकारचे पक्षी, फूलपाखरे, जलचर आढळून येतात. अनेक पर्यावरण प्रेमी देवीचापाडा खाडी किनारी नियमित भ्रमंतीसाठी येतात.

हेही वाचा <<<विश्लेषण : ठाणे जिल्ह्यातील डम्पिंग ग्राउंड समस्या का बनली आहे उग्र?

पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवली शाखेतर्फे देवीचापाड खाडी किनारी दरवर्षी खारफुटी दिनाचे औचित्य साधून खारफुटी रोपांची लागवड केली जाते. या रोपांची वाढ व्हावी म्हणून वर्षभर त्यांची काळजी घेतली जाते. पुणे, मुंबई भागातील अनेक पर्यावरणप्रेमी अभ्यासक डोंबिवली खाडी किनारी जैवविविधतेच्या संशोधन अभ्यासासाठी येतात, असे पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवली शाखेच्या रुपाली शाईवाले यांनी सांगितले. अनंत चतुर्दशी नंतर नेहमीप्रमाणे अनेक पर्यावरणप्रेमी देवीचापाडा येथील खाडी किनारी गेले, तेव्हा त्यांना खाडी किनारची जेट्टीच्या बाजुची सर्व जुनाट खारफुटीची झाडे तोडून टाकण्यात आली आहेत असे दिसले. ३० ते ४० वर्षाची खारफुटीची झाडे तोडून टाकण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही झाडे कोणी तोडली. याची विचारपूस पर्यावरणप्रेमींनी परिसरात केली. त्यावेळी त्यांना गणपती विसर्जन काळात खाडी किनारी खासगी घरगुतीचे गणपती विसर्जन करणाऱ्या दोन भाविकांना प्रवेश होता. बाकी भाविकांना खाडी किनाऱ्यापासून ५० ते ६० फूट उंतरावर उभे केल जात होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोजक्याच प्रतिनिधींना खाडी किनारी प्रवेश दिला जात होता. गणपती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना आपल्या बाप्पाचे खाडीत विसर्जन होताना पाहाता यावे म्हणून काही अज्ञातांनी खारफुटीची झाडे तोडली असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा <<<डोंबिवली, ठाणे येथे नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान, कडोंमपातर्फे १७५ टन निर्माल्याचे संकलन

कल्याण डोंबिवली पालिकेचे विसर्जन ठिकाणी नियंत्रण असताना ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त, कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला नाही का. त्यांनी झाडे तोडण्यास विरोध का केला नाही, असे प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणाची निसर्गप्रेमींकडून जिल्हाधिकारी, कांदळवन विभाग अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.

देवीचापाडा खाडी किनारी खारफुटी संवर्धनासाठी पर्यावरण दक्षता मंच अनेक उपक्रम राबवित आहे. येथील जैवविविधता अभ्यासाठी विविध भागातून विद्यार्थी येतात. दरवर्षी या भागात खारफुटी लागवड केली जाते. हे माहिती असुनही खारफुटीची जुनाट झाडे तोडण्यात आली आहेत. हे दुर्देवी आहे.

रुपाली शाईवाले, पर्यावरण दक्षता मंच डोंबिवली

देवीचापाडा विसर्जन घाटावर गणपती विसर्जनासाठी पालिकेने खारफुटी तोड केलेली नाही. ही तोड कोेणी केली आहे याविषयी आपणास माहिती नाही. संदीप रोकडे, साहाय्यक आयुक्त ह प्रभाग, डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cutting mangroves ganapati immersion devichapada dombivli outrage environmentalists ysh
Show comments