कळवा येथील शिवशक्ती नगरभागात एका घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. ज्या घरात स्फोट झाला त्याच्या खालीच सिलेंडर कंपनीची एजन्सी आहे. स्वयंपाक करत असताना हा स्फोट झाला. यामध्ये चारजण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमासार ही दुर्घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी रात्री शिवशक्ती नगरभागात सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराचे पत्रेदेखील खाली पडले तसंच भितींनाही तडा गेला. या स्फोटात चौघे जखमी झाले असून गंभीर जखमी आहेत. सत्यम यादव (२०), अनुराज सिंह (१९), रोहीत यादव (२०), गणेश यादव (१९) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण ८० ते ९० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्याठिकाणी एजन्सी होती ते तळ अधिक एक मजल्याचे घर आहे. यातील वरच्या मजल्यावर घर असून स्वयंपाक करताना हा स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरातील इतर दोन घरांचे पत्रे उडाले. जखमींवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cylinder blast in kalva cause four injured sgy