लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बदलापूर : बदलापूर पश्चिमेचा मांजर्ली भाग मंगळवारी सकाळी सिलेंडर स्फोटाने हादरला. मांजर्लीच्या म्हात्रे चौकात एका हातगाडीमध्ये असलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यात शेजारी साफसफाई करणारा कामगार जखमी झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की एक किलोमीटरपर्यंतच्या इमारतींपर्यंत धक्का जाणवला. तर येथील नामदेव प्लाझा इमारतीच्या अनेक घरांच्या काचा फुटल्या. हा चौक सर्वाधिक वर्दळीचा चौक आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बदलापूर पश्चिम येथील मांजर्ली भागात म्हात्रे चौक वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. या चौकात नामदेव प्लाझा नावाची इमारत आहे. या इमारतीच्या मोकळ्या परिसरात सकाळी पावणे दहाच्या सुमारास नीरज साहा (२२) साफसफाई करत होता. इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेतील कचरा आणि पालापाचोळा गोळा केल्यानंतर त्याने तो पेटवला. याच परिसरात अनेक टपऱ्या आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. यातील एक हातगाडी शेजारीच उभी होती. कचरा पेटवल्यानंतर काही क्षणात या हातगाडीचा स्फोट झाला. या हातगाडीत एक सिलेंडर असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे. ही हातगाडी नेमकी कोणाची याची माहिती कळू शकली नाही. मात्र या स्फोटात नीरज साहा जखमी झाला आहे. त्याला तात्काळ शेजारच्या खाजगी दवाखान्यात प्रथमोपचारासाठी पाठवण्यात आले. नंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

आणखी वाचा-Titwala-Shilphata bypass road : टिटवाळा-शिळफाटा बाह्यवळण रस्ते मार्गातील अडथळे दूर

अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे असलेल्या टपऱ्या आणि आसपासच्या भागात पाणी मारले. या स्फोटाने नामदेव प्लाझा या इमारतीतील अनेक घरांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यात सकाळच्या सुमारास स्पोर्ट झाल्याने अनेक जण वाचले. या चौकात गेल्या काही वर्षात अनेक टपऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या राहू लागल्या आहेत. येथे उघड्यावर गॅस सिलेंडरच्या खाद्यपदार्थ तयार केले जातात. याच भागात दवाखाने, इमारती, अनेक दुकाने आहेत. सायंकाळी स्फोट झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती अशी भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या स्फोटानंतर अशा बेकायदा टपऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी होते आहे. थोड्याशा पैशांसाठी अशा हातगाड्या उभा करण्यास परवानगी देत असल्याचा आरोप केला जातो आहे.