योगीराज बागुल यांची माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या चळवळीला ज्या अनेक दलितेतर लोकांनी सहकार्य केले, त्यांना त्यांच्याच जातभाई समाजबांधवांनी वाळीत टाकले. त्यातील अनेकांच्या मुलींची लग्ने झाली नाहीत. त्यांना त्यांच्या समाजातल्या लोकांनीच अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली, असे प्रतिपादन आंबेडकरांच्या जीवनकार्याचे अभ्यासक आणि ‘बाबासाहेब आंबेडकरांचे दलितेतर सहकारी’ या पुस्तकाचे लेखक योगीराज बागुल यांनी केले. ‘पुस्तकप्रेमींचे ठाणे’ या साहित्य महोत्सवात ते बोलत होते.

दगडूशेठ भिलारे, भाई अनंतराव चित्रे, नारायण नागू पाटील, प्रा. म. भि. चिटणीस, शंकरराव खुळे, डी. जी. जाधव, जयंत देशमुख, पांडुरंग साळवी, बापूसाहेब सहस्रबुद्धे, सुरभा नाना टिपणीस यांसारख्या अनेक दलितेतर कार्यकर्त्यांनी आंबेडकरांच्या चळवळीला अत्यंत मोलाचे योगदान दिले. आंबेडकरांनीही त्यांच्या या सहकाऱ्यांची पुरेपूर काळजी घेतली, यावर प्रकाशझोत टाकणारे अनेक किस्से त्यांनी सांगितले.