ठाणे : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील परिसरात विद्युत खांब पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून या घटनेत कुणीही जखमी झालेले नसले तरी पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अशा धोकादायक खांबांचे सर्वेक्षण करून ते बदलण्याचे काम सुरु केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील परिसरात ५ जून रोजी एक विद्युत खांब पडला. बाजूच्या झाडावर हा खांब पडल्याने मोठी दुर्घटना टळली. यापूर्वी विद्युत खांब अंगावर पडून अनेकजण जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये अशाच घटनेत कादंबरीकार सुदीप नगरकर गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी महापालिका विद्युत विभागाने ठेकेदारांमार्फत विद्युत खांबांची पाहणी सुरू केली असून त्यात जुने आणि जीर्ण झालेले धोकादायक खांब बदलण्यात येत आहेत. आठ ते नऊ खांब बदलण्यात आले असून हे काम सुरू आहे. या वृत्तास महापालिका विद्युत विभागाचे उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांनी दुजोरा दिला आहे.