विरारमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीची तिच्याच पित्याने डोक्यात हातोडीचे वार करून निघृणपणे हत्या केली, शनिवारी सकाळी ही घटना घडली होती. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विरार पश्चिमेच्या तिरुपती नगर परिसरातील युनिक एम्पायर येथे दत्ताराम जोशी (वय ५४) हे पत्नी आणि मुलगी आकांक्षा (वय २०) राहतात. आकांक्षा विवा महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. अर्नाळा सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी आणि मुलगी आकांक्षा यांच्यात वारंवार खटके उडत होते. शनिवारी सकाळी देखील अशाच वादातून जोशी यांनी घरातील हातोड्याने आकांक्षावर वार केले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

अर्नाळा सागरी पोलिसांनी जोशी यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हत्येचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली.

Story img Loader