ठाणे: चाळीत राहत असल्याने सार्वजनिक स्वच्छता गृह वापरावी लागत होती. प्रसाधन गृहांची अस्वच्छता आणि त्यातून होणारे संसर्ग याची लागण आईला झाली. त्यामुळे आईला झालेला त्रास आणि होणारी गैरसोय यावर उपाय म्हणून नवी मुंबईतील महापालिका शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांनीने संशोधन करून डिस्पोजल फिमेल युरिनेशन डिव्हाइस तयार केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध नसते. तसेच प्रसाधनगृहे असले तरी सुस्थितीत नसतात. त्यामुळे महिलांना संसर्गजन्य रोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. नवी मुंबईतील असेच एक कुटुंब चाळीत वास्तव्यास होते. सर्वांसाठी एकच स्वच्छतागृह होते. त्यामुळे विद्यार्थिनीच्या आईला संसर्गजन्य आजार झाला. आपल्या आईला हा त्रास सतत होत आहे हे पाहून त्यावर उपाय म्हणून मुलीने एक संशोधन केले. या समस्येबाबत मुलीने शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्रयोग करून डिस्पोजल फिमेल युरिनेशन डिव्हाइस निर्मिती केली आहे. हे डिव्हाइस सर्व महिलांना प्रवास करत असताना, नोकरी करताना नैसर्गिक विधीसाठी वापरता येणारे असे आहे. या डिव्हाइसचा एक वेळ वापर करून ते विघटन करण्यास देखील सोपे असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले आहे. या डिव्हाइसची रचना सॅनिटरी नॅपकीन सारखी आहे. यामध्ये वापरण्यात आलेले घटक निर्जंतुकीकरण करणारे आहेत. पल्लवी सोळंकी आणि प्रीती चिन्हाराठोड या नवी मुंबईतील महापालिका शाळा क्रमांक ४६ मध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहेत. विद्यार्थिनींचा या प्रयोगाची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत निवड झाली आहे.

आणखी वाचा-डोंबिवली एमआयडीसीतील मलवाहिन्या, गटारांवर मातीचे भराव

आईला सतत हा आजार होत होता. त्या करिता आपण काही उपाय करू शकतो का यावर मी शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी आणि माझ्या सहकारी मैत्रिणीने मिळून हा प्रयोग केला आहे. तसेच हा प्रयोग सर्व महिलांसाठी उपयुक्त असा आहे. -प्रीती चिन्हाराठोड, विद्यार्थिनी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughters research as a remedy for her mothers illness disposable female urination device designed for women mrj