ठाण्यातील मासुंदा तलावात मंगळवारी सकाळी सुमारे ७० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. महिलेची ओळख पटलेली नाही. मृतदेह आढळल्याने सकाळी तलाव परिसरात फेरफटका मारण्यासाठी आणि व्यायामासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मासुंदा तलाव परिसरात अनेकजण फेरफटका मारण्यासाठी तसेच व्यायामासाठी सकाळी येत असतात. मंगळवारी सकाळी ९:४५ वाजताच्या सुमारास तलावातील दत्त घाटाजवळ महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead body found in masunda lake in thane zws
Show comments