ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा भागात गिर्यारोहणासाठी गेलेल्या संजीव देशपांडे (६२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२७ फेब्रुवारी) उघडकीस आली. या प्रकरणाची नोंद चितळसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजीव देशपांडे हे पवई येथील हिरानंदानी इस्टेट भागात राहत होते. ते दररोज त्यांच्या गटासोबत सकाळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गिर्यारोहणासाठी जात असत. परंतु रविवारी ते एकटेच गिर्यारोहणासाठी गेले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांनी घोडबंदर-मानपाडा येथील निसर्ग परिचय केंद्राजवळ वाहन उभे केले. त्यानंतर त्यांनी उद्यानात प्रवेश केला. परंतु दुपारी उशीरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो होऊ शकत नव्हता.

दुपारनंतर संजीव देशपांडे यांचे कुटुंबिय आणि त्यांच्या मित्रांनी याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वन विभागाने चितळसर पोलीस, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संजीव यांचे गिर्यारोहक मित्र यांच्या मदतीने दुपारी ३ वाजेच्या सुमारास संजीव यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

हेही वाचा : डोंबिवली : कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवत अंत्यसंस्कार रोखला, नातेवाईकांना जबर मारहाणीचा धक्कादायक प्रकार

सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पथकाला संजीव हे टायगर पॉईंट येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पथकाने त्यांना तात्काळ उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची नोंद चितळसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.