ठाण्यात कशेळी पुलावर रघुनाथ साळुंखे या दुचाकीस्वाराला मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने साळुंखे यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्याहून भिवंडीकडे जाताना कशेळी पुलावर, दत्त मंदिरासमोर शनिवारी रात्री रघुनाथ साळुंखे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी गतिरोधक आल्याने आपल्या वाहनाचा वेग कमी केला. यावेळी मागून भरधाव आलेल्या वाहनाने साळुंखेंच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-12-2015 at 03:06 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of one due to vehicle collision