कल्याण येथील पूर्व भागातील सूचकनाका भागातील सिध्दार्थ विद्यामंदिर शाळेतील आफताब सय्यद (१३) या सातवीच्या विद्यार्थ्याचा शाळेतून घरी आल्यावर अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवजयंती निमित्त शाळेच्या आवारात मातीचे किल्ले बांधणीचे काम सुरू आहे. या किल्ल्यासाठी डोंगरातून माती आणण्याचे काम विद्यार्थी करत आहेत. आफताबला उन्हाचा त्रास होऊन ही दुर्घटना घडली असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई; रस्ते, पदपथ मोकळे

कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शाळा प्रशासनाने ही घटना दुर्देवी असल्याचे जाहीर करुन याविषयी अधिक बोलणे टाळले आहे. शाळे जवळ असलेल्या डोंगरातून विद्यार्थी पाच किल्ले बांधणीसाठी माती आणत होते. आफताब त्यात सहभागी होता. मंगळवारी आफताब शाळेत गेला होता. नेहमीप्रमाणे तो माती आणण्यासाठी डोंगरात गेला होता. शाळेतून घरी परतल्यावर अस्वस्थ झालेला आफताब जमिनीवर कोसळला. कुटुंबियांनी त्याला तात्काळ डाॅक्टरकडे नेले. तोपर्यंत तो मृत झाला होता.