कल्याण येथील कोलीवली आणि टिटवाळ्यातील बल्याणी येथील गृहप्रकल्पात एक कोटी ७५ लाख रुपये किमतीच्या तीन सदनिका खरेदी करणाऱ्या घर खरेदीदारांना घरांचा ताबा देण्यास मयत विकासकाच्या वारसांनी नकार दिला आहे. ज्या विकासका बरोबर तुमचा व्यवहार झाला होता. त्याच्या बरोबर तुम्ही बघून घ्या, अशी उत्तरे विकासकाचे वारस देत असल्याने घर खरेदीदारांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
विद्या मोरे (५७, रा. अंधेरी), मुलगा गौरव मोरे, भाऊ महेंद्र नाईक या घर खरेदीदारांची फसवणूक झाली आहे. विद्या मोरे यांनी या फसवणूक प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात कल्याण मधील बेतुरकरपाडा येथील मयत विकासक बाळू कान्हू गावडे यांचे वारस हर्षद गावडे, शोभा बाळू गावडे, वृषाली पुनीत घाडगे, वृंदा राजेश पवार, हर्षदा वैभव वरगुडे यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले, डिसेंबर २०१९ मध्ये तक्रारदार विद्या मोरे आणि तिच्या नातेवाईकांनी विकासक बाळू गावडे यांच्या बरोबर कोलीवली, टिटवाळ्या येथील बल्याणी मधील गृह प्रकल्पात तीन सदनिका खरेदीचे व्यवहार केले होते. घर खरेदीसाठी तक्रारदार आणि तिच्या नातेवाईकांनी एक कोटी ७५ लाख रुपये विकासक बाळू गावडे यांना धनादेशाव्दारे दिले होते. गृह प्रकल्पांची कामे सुरू असताना दोन वर्षापूर्वी विकासक बाळू गावडे यांचे निधन झाले. त्यामुळे घर खरेदीदारांनी त्यांचा मुलगा हर्षद यांच्याकडे वडिलांबरोबर केलेल्या कराराप्रमाणे घरांचा ताबा मिळण्याची मागणी सुरू केली.
हेही वाचा >>> ठाण्यात वज्रमुठ सभेच्या बॅनरवर पालिकेची कारवाई; राष्ट्रवादीची पालिका प्रशासनावर टीका
हर्षद आणि त्याच्या नातेवाईकांनी तुम्ही व्यवहार आमच्या वडिलांबरोबर केले होते. त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेतली. हा प्रकार ऐकून घर खरेदीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. घराचा ताबा द्यायचा नसेल तर दिलेले पैसे परत करा, अशी आग्रही मागणी तक्रारदार करू लागले. त्याला हर्षद आणि त्यांचे नातेवाईक दाद देत नव्हते. गावडे कुटुंबीयांकडून घरांचा ताबा मिळण्याची आशा मावळल्याने आणि त्यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर विद्या मोरे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.