ठाणे : ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी रंगरंगोटीच्या माध्यमातून सुशोभिकरणाची कामे सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून पथके तयार करून त्यामार्फत रस्त्यालगत पडलेला राडारोडा उचलण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पंधरा दिवसांपुर्वी दिले होते. परंतु या आदेशाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने बाळकुम भागातील रस्त्यालगत राडारोड्याचे ढिग कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवलीत बैठकांचा सपाटा, कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिका सुशोभिकरणाचा उपक्रम राबवित असून त्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील उड्डाणपुल,  अंतर्गत रस्त्यालगतच्या भिंती, तलाव परिसर तसेच अन्य भागामध्ये विविध संकल्पनेवर आधारित चित्र काढण्यात येत आहेत. या रंगरंगोटीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत असतानाच दुसरीकडे रस्त्यालगत राडारोडा फेकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रकारांमुळे शहर सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण होत आहे. ही बाब ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याही निदर्शनास आली असून त्यांनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी दक्षता पथके नेमण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. त्यापाठोपाठ पंधरा दिवसांपुर्वी त्यांनी बैठक घेऊन त्यात शहरातील रस्त्यांच्या कडेला ज्या-ज्या ठिकाणी राडारोडा नजरेस पडेल तो तातडीने उचलण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>> ठाणे : सार्वजनिक उद्यानात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा उचलण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर विशेष पथके तयार करण्यात यावी. या पथकाच्या माध्यमातून सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत दोन पाळीमध्ये शहरभर गाड्या फिरत राहतील आणि त्यांच्यामार्फत राडारोडा उचलला जाईल याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश त्यांनी बैठकीत दिले होते. या आदेशानंतरही बाळकुम येथून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्याक़डेला राडारोड्याचे मोठे ढिग दिसून येत असून याठिकाणी राडारोडा टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

राडारोडा उचलण्याचे काम सुरु

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानंतर शहरातील मुख्य रस्त्यांसाठी तीन पथके तयार करण्यात आली असून त्यामार्फत राडारोडा उचलण्याचे काम सुरु झाले आहे. काही ठिकाणी पथके नेमण्याचे काम सुरु असून या पथकामार्फत उर्वरित भागातील राडारोडा उचलण्यात येईल, असे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.