कल्याण – टिटवाळा येथील गणेश मंदिराजवळ म्हाडाचा आरक्षित भूखंड आहे. या भूखंडांवर भूमाफियांनी बेकायदा बांधकामे करून या बांधकामातील गाळे व्यापाऱ्यांना विकले आहेत. काही गाळे भाड्याने दिले आहेत. म्हाडाच्या भूखंडांवर अतिक्रमणे वाढत असल्याने पालिकेच्या अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी याप्रकरणी म्हाडाला कळविले. म्हाडा आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संयुक्त पाहणी करून या भूखंडावरील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टिटवाळा येथे म्हाडाचा कोकण मंडळ अंतर्गत भूखंड आहे. या भूखंडावर घरकुल योजनांसाठी उत्पन्न गटाप्रमाणे एकूण २६१ भूखंड आहेत. म्हाडाचे या भूखंडांकडे लक्ष नसल्याने भूमाफियांनी या भूखंडांवर गाळे, एक माळ्याची बेकायदा बांधकामे करून त्याची विक्री करणे, गाळे भाड्याने देण्याचे प्रकार सुरू केले होते. पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून म्हाडा्च्या टिटवाळा येथील भूखंडावर सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत कळविले. या भूखंडाची चतुसिमा, सीमारेषा निश्चित करून म्हाडाच्या भूखंडावरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याच्या दृष्टीने पालिका आणि म्हाडा अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करण्याचे ठरविले.

हेही वाचा – कल्याणमधील सारस्वत बँकेत ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा

मंगळवारी म्हाडाचे अधिकारी, साहाय्यक आयुक्त वाघचौरे यांनी टिटवाळा येथील म्हाडा भूखंडाची पाहणी करून भूखंडाची हद्द निश्चिती पालिका अधिकाऱ्यांना दाखवून दिली. या भूखंडावर मटण विक्री, फर्निचर विक्री, लादी विक्री, खानावळ, किराणा दुकाने अशाप्रकारची २५ हून अधिक दुकाने आहेत. ही बांधकामे करताना या भूखंडावरील झाडे माफियांनी तोडली आहेत.

म्हाडाच्या भूखंडाची हद्द निश्चिती केल्यानंतर साहाय्यक आयुक्त वाघचौरे यांनी तात्काळ या भूखंडावरील सुदाम इप्पर, एम. आर. हुसेन, सलमान मटण दुकान, एकविरा खानावळ, आर. के. सुपर मार्केट, शिवशक्ती फर्निचर, गुडलक फर्निचर आणि इतर दुकानदारांना जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. विहित मुदतीत या जागा खाली करण्यात आल्या नाही तर ही बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जाणार आहेत, असे साहाय्यक आयुक्त वाघचौरे यांनी सांगितले.

हेही वाचा – व्यापार आणि साठा परवाना न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडोंमपा उगारणार कारवाईचा बडगा

आयुक्तांकडून पाहणी

टिटवाळा येथील मैदान, क्रीडांगण, उद्यान भूखंडांची आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी पाहणी केली. या भूखंडांना संरक्षित भिंत घालून तातडीने हे भूखंड आहे त्या सुविधांसाठी विकसित करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी साहाय्यक आयुक्त वाघचौरे उपस्थित होते.

“टिटवाळा येथील म्हाडाचा भूखंड हा म्हाडाच्या अंतर्गत आहे. या भूखंडावरील कोणत्याही व्यवहाराला नागरिकांनी बळी पडू नये. म्हाडा अधिकाऱ्यांनी या भूखंडाची हद्द निश्चित केल्याने या भूखंडावरील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जाणार आहेत.” – दिनेश वाघचौरे, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग, कल्याण.