ठाणे : ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे १८ लोकांच्या मृत्यूसंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी कमिटी नियुक्ती करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी जाहीर केले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व मंत्री दीपक केसरकर यांनी घडलेल्या घटनेबद्दल ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची चौकशी केली.

यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याने मी तात्काळ विमानाने मुंबई येथे आलो. झालेल्या प्रकाराबद्दल नि:ष्पक्ष पारदर्शीपणे चौकशी करण्यासाठी शासनाने समितीची नियुक्ती केली आहे. आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, आरोग्य संचालनालयाचे संचालक, अतिदक्षता विभागाचा तज्ञ, जिल्हा शल्यचिकित्सक हे या समितीचे सदस्य असणार आहेत. या समितीने चौकशी अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहेत.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

हेही वाचा – कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची चौकशी होणार, मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानुसार समिती गठीत

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन केले जाते. १८ मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी ८ रुग्ण गंभीर स्थितीमध्ये आले होते. या रुग्णांना वैद्यकीय स्थिती माहीत नसते, तेव्हा शवविच्छेदन केले जाते. १८ रुग्ण दगावणे, ही मोठी घटना आहे. एक रुग्ण जरी दगावला तरी ते दु:खदायक असते. या हॉस्पिटलची क्षमता ५०० रुग्णांची आहे तरी या रुग्णालयात ५८८ रुग्ण ठेवण्यात आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये ३५० बेडची क्षमता आहे परंतु १५० बेडस् खाली आहेत. जिल्हा रुग्णालय बंद नसून ते मेंटल हॉस्पिटलच्या ठिकाणी हलविण्यात आलेले आहे, असे सूचना/दिशादर्शक फलक जेथे जिल्हा रुग्णालयाचे काम चालू आहे तेथे लावण्याच्या सूचना यावेळी मंत्री केसरकर यांनी दिल्या, जेणेकरून ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यासाठी मदत होईल, असेही ते म्हणाले.

५०० बेडच्या हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांचे रुग्ण येत असतात. अतिदक्षता विभागाची संख्या आधी २० होती, आता ती ४८ करण्यात आलेली आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण गंभीर झाले की, या हॉस्पिटलमध्ये पाठविले जातात. नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर रुग्णाच्या नातेवाईकांना मदत करता येत नाही. उपचारादरम्यान जर हलगर्जीपणा झाला असेल, आणि अहवालात हे सिद्ध झाले तर दोषीवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या दु:खामध्ये आम्ही सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “देशाच्या जीडीपीच्या….”, कळव्यातील मृत्यूप्रकरणी अमोल कोल्हेंनी सांगितली वस्तुस्थिती; म्हणाले, “तीन वर्षांपासून…”

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, घडलेल्या प्रकरणाबद्दल सखोल चौकशी होईल. अशा घटना पुन्हा होऊ नये, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. घडलेला प्रसंग हा निश्चितच दुर्दैवी आहे. आरोग्य सुविधा कमी पडू नये यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. घडलेल्या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

यावेळी ठाणे महापालिकेचे आयुकत अभिजित बांगर यांनी झालेल्या घटनेची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिली. १८ मृत्यूपैकी पुरुष ८ व महिला १० आहेत. दोन महिन्यांपूर्वी ४० परिचारिकांची भरती करण्यात आलेली आहे. परिचारिकांची रुग्णाची काळजी घेण्यासाठी खूप गरज असते. कोविड काळातील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यांची छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. पूर्वी शस्त्रक्रिया फक्त दिवसा करण्यात येत होती, आता रात्रीसुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची गैरसोय टळणार आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनीही सांगितले आहे की, ते स्वतः मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या सतत संपर्कात असून त्यांच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची गैरसोय होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.