अंबरनाथ येथील बालाजी नगर परिसरात शस्त्रांच्या धाकाने नागरिकांना धमकाविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या नावावर ५० हून अधिक सायबर गुन्हे दाखल आहेत. राजू तेवर (३३) आणि शिलेंद्र पांडे (३२) अशी या दोघांची नावे आहेत. त्यापैकी राजूकडे एक हत्यार सापडले आहे. या दोघांवर नवी दिल्लीत क्रेडिट कार्ड आणि सायबर संबंधित ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापैकी क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या गुन्ह्य़ात तीन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस राजूचा शोध घेत होते.

Story img Loader