लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा भागातील अर्जुनली टोल नाक्याच्या पुढे खडवली रेल्वे स्थानकाकडे जाणारा फाटा आहे. या फाट्यावर जाण्यासाठी महामार्गावरुन वाहन चालकांना वळण घ्यावे लागते. महामार्गावरील भरधाव वेगात असलेल्या वाहनांची वळण घेणाऱ्या वाहनांना धडक बसून अपघात होत आहेत. अपघातप्रवण या वळण मार्गावर उड्डाण पूल बांधण्यात यावा, अशी मागणी खडवली, पडघा परिसरातील ग्रामस्थांनी सुरू केली आहे.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

आन्हे गावाजवळ खडवली रेल्वे स्थानकाकडे जाणारा खडवली फाटा महामार्गावर आहे. महामार्गावरुन खडवली रेल्वे स्थानकाकडे वळण घेताना अनेक वाहनांना या वळण रस्त्यावर अपघात झाला आहे. गेल्या अनेक वर्षाच्या काळात शेकडो प्रवाशांचे जीव या अपघातात गेले आहेत. अनेक वर्षापासून या वळण रस्त्यावर होत असलेल्या अपघातामुळे या भागात उड्डाण पूल बांधावा, अशी मागणी खडवली, पडघा भागातील नागरिक शासनाकडे करत आहेत. त्याची दखल घेण्यात आलेली नाही, अशी माहिती खडवली येथील जागरुक रहिवासी दिनेश बेलकरे यांनी दिली.

आणखी वाचा-मुंबई-नाशिक महामार्गावर वासिंद, आसनगाव येथील दररोजच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

पडघा परिसरात ३० ते ४० गावे आहेत. या गाव परिसरातील नागरिकांना नोकरी, व्यवसाय, शाळा, महाविद्यालयांसाठी मुंबई, नाशिक भागात जायचे असेल तर त्यांना खडवली रेल्वे स्थानकातून इच्छित स्थळी लोकलने प्रवास करावा लागतो. गावांमधून रिक्षा, जीपने प्रवासी पडघा येथे येतात. तेथून खडवली रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा, जीपचा वापर करतात. पडघा येथून खडवली येथे जाण्यासाठी एस. टी. बसची संख्या तुरळक आहे. त्यामुळे प्रवासी रिक्षा, काळ्या पिवळ्या जीपना प्राधान्य देतात, असे बेलकरे म्हणाले.

पडघा येथून येणारे किंवा खडवली येथून पडघा, नाशिककडे जाणारे वाहन महामार्गावर खडवली फाटा येथे वळण घेत असेल आणि त्याचवेळी नाशिककडून सुसाट वेगाने अवजड वाहन येत असेल तर अवजड वाहन चालकाला अचानक ब्रेक लावून वाहन थांबविणे शक्य नसते. किंवा मोटार चालक १०० ते १२० च्या वेगात मोटार चालवित असेल तर तोही तात्काळ ब्रेक लावून वाहन थांबू शकत नाही. त्यामुळे खडवली फाट्यावर अपघात होत आहेत, असे वाहतूक क्षेत्रातील एका जाणकाराने सांगितले.

आणखी वाचा- बदलापुरहून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प; कुळगाव बदलापूर नगरपालिकेतर्फे सतर्कतेचा इशारा

मंगळवारी सकाळी खडवली फाटा येथे वळण घेत असताना पडघा येथून काळ्या पिवळ्या जीपने प्रवास करत असलेल्या १० प्रवाशांच्या जीपला कंटेनेरने जोराची धडक दिली. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले. आठवड्याला दोन ते तीन अपघात खडवली फाट्यावर होत असतात.

खडवली फाट्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण विचारात घेऊन खडवली येथील मनसेचे जिल्हा सहसचिव लक्ष्मण भगत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खडवली फाटा येथे तातडीने उड्डाण पूल उभारणीसाठीच्या हालचाली करण्याची मागणी केली आहे. मागील १५ वर्षापासून आम्ही खडवली फाटा येथे पूल उभारणीची मागणी करत आहोत. कोणीही लोकप्रतिनिधी, बांधकाम अधिकारी आमच्याकडे महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देत नसल्याची खंत भगत यांनी पत्रात व्यक्त केली आहे.