ठाणे : Jitendra Awhad talk Barsu Refinery Project आपल्या हौसेखातर खारघरमध्ये १४ बळी घेण्यात आले. आता रिफायनरी नको म्हणून बारसू पंचक्रोशीतील सर्वच गावे भांडत आहेत. तरीही लाठीचार्ज, अश्रूधूर असे प्रकार केले जात आहेत. ही तर राक्षसी राजवट आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केली आहे. या सरकारने हे ध्यानात ठेवावे की, आज गवत जाळले आहे, उद्या ग्रामस्थ प्रकल्प जाळतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

बारसू येथील रिफायनरीला विरोध करण्यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी लाठीचार्ज करण्यात आला. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रचंड संताप व्यक्त केला. जो काय प्रकार सुरू आहे. तो महाराष्ट्र बंद नव्हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. ही दादागिरी महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण आज बारसूतील ग्रामस्थांवर जी वेळ आली आहे, ती उद्या आपल्यावरही येणार आहे. या आंदोलनात सत्यजित चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलकांचे नशिब की त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेऊन त्यांच्यावर अद्याप देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. जास्त दांडगाई जनता सहन करत नाही, हेच या सत्ताधाऱ्यांना समजत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हेही वाचा >>> “रक्त घ्या, पण पाणी द्या” अंबरनाथमध्ये कॉंग्रेसचे पाण्यासाठी आंदोलन

कोणताही प्रकल्प रेटून नेता येत नाही. शरद पवार यांनी चर्चेने हा प्रश्न मार्गी लावावा, असे म्हटले होते. पण, या सरकारला हृदय नाही. महिलांना मारहाण केली जात आहे. ही विनाश काले विपरीत बुद्धी आहे. सत्तेचा अहंकार योग्य नाही. स्थानिकांना जर हा प्रकल्प नको असेल तर जुलूम का ? आज लाठीचार्ज करून मोजमाप कराल. उद्या गोळीबारही करतील. गरिबांच्या जीवाची पर्वाच नाही. गरीबांचा जीव गेला तरी त्यांना फरक पडत नाही. गरीब मेल्यानंतर लाकडे सरकार पुरवेल. या सरकारने हे ध्यानात ठेवावे की, आज गवत जाळले आहे, उद्या ग्रामस्थ प्रकल्प जाळतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader