कल्याण: पावसाळ्यात जागोजागी दलदल, पाणी साठण्याचे प्रकार होत असल्याने डेंग्यु, मलेरियाचे रुग्ण शहराच्या विविध भागात आढळून येत आहेत. पाऊस जाऊन दोन महिने झाले तरी शहराच्या विविध भागात विशेष करुन झोपडपट्टी, चाळी भागात रहिवासी पाण्याचे पिंप भरुन ठेवत आहेत. नवीन इमारत बांधकामांच्या ठिकाणी खोदलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरलेले दिसत आहेत. या साठवण पाण्यावर तयार झालेले डास साथ आजार पसरवतात, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या मढवी आरोग्य केंदाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. पौर्णिमा ढाके यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साथीच्या आजारासारखी परिस्थिती शहरात नाही. पाऊस असताना जे प्रमाण डेंग्यु, मलेरिया रुग्णांचे होते ते प्रमाण कमी झाले आहे. मागील तीन आठवड्यात डेंग्यु, मलेरिया रुग्णांचे प्रमाण होते. रुग्ण ज्या भागात आढळले त्या भागात घरोघर परिचारिकांनी रहिवाशांची वैद्यकीय तपासणी, फवारणी विभागाने जंतुनाशक फवारणी केली. त्यामुळे हे प्रमाण कमी झाले आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: डोंबिवली: तळ कोपर ते अप्पर कोपर रेल्वे स्थानका दरम्यान करण्यात येणार पादचारी पुलाची उभारणी

विकासकांवर कारवाई
वैद्यकीय आरोग्य क्षेत्रातील झोपडपट्ट्या, चाळी भागात परिचारिका जाऊन रहिवाशांना पाण्याची साठवण करून ठेऊ नका म्हणून आवाहन करत आहेत. अनेक दिवसांपासून पाण्याचे पिंप भरुन ठेवलेले पाहून स्वता परिचारिका ते पाणी उपसा करुन फेकून देतात. पाणी आले नाहीतर या भीतीने रहिवासी अनेक दिवस पाण्याचे पिंप भरुन ठेवतात. घरातील फूल, वेलींच्या कुंड्यांमध्ये सतत पाणी राहिले तर साथ आजाराचा डास उत्पत्ती करतो. त्यामुळे सोसायटयांमधील रहिवाशांना कुंड्यांमध्ये पाणी साठवण होणार नाही. तेथे मोकळे वातावरण राहिल याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. ढाके यांनी सांगितले.

अनेक भागात नवीन बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या बांधकामाच्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचे पाणी तर काही ठिकाणी टँकरने पाणी आणून ओतण्यात येत असल्याचे दिसते. या उघड्या साठवण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे विकासकांना संबंधित ठिकाणचा पाणी साठा काढून टाकण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. जे विकासक पाणी साठा काढणार नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे डाॅ. पौर्णिमा ढाके यांनी सांगितले.

हेही वाचा: ठाण्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ; २७१ संशयित रुग्णांमध्ये ३७ रुग्ण गोवर रुबेला बाधीत

खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी
खासगी दवाखान्यांमध्ये मलेरिया, डेंग्युचे अधिक संख्येने उपचारासाठी येत आहेत. ताप, अंग, सांधे आणि डोकेदुखीचा त्रास या आजारात होतो, असे डाॅक्टरांनी सांगितले. उपचारी बहुतांशी रुग्ण चाळ, झोपडपट्ट्या भागातील आहेत, असे खासगी डाॅक्टरांनी सांगितले.
“ साथ आजाराची परिस्थिती कल्याण डोंबिवलीत नाही. मलेरिया, डेंग्युचे रुग्ण कधी कमी तर काही भागात दोन ते तीन रुग्ण आढळून येतात. त्या भागात तात्काळ उपाययोजना केल्या जातात. रुग्ण संख्या वाढणार नाही यादृष्टीने नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उपाययोजना केल्या आहेत.” -डाॅ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कडोंमपा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue malaria cases are increasing in kalyan dombivli due to water storage system kdmc tmb 01