ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाने अटक केली. अथर्व मुंडकर (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हद्दपार केले असतानाही तो घोडबंदर येथील कासारवडवली भागात वास्तव्यात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाणे : रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटकेत

कासारवडवली येथील भवानीनगर परिसरात अथर्व हा राहतो. त्याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल असल्याने ठाणे पोलिसांनी त्याला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यातील महसूली क्षेत्रातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. त्यानंतरही तो भवानीनगर परिसरात छुप्या पद्धतीने वास्तव्य करत होता. त्यासंंदर्भाची माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षास मिळाली असता, पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली.