ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या राकेश जाधव (२४) याला ठाणे पोलिसांनी वागळे इस्टेट येथून अटक केली आहे. हद्दपार असतानाही तो वागळे इस्टेटमध्ये वास्तव्य करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. वागळे इस्टेट येथे राहणाऱ्या राकेश जाधव विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी त्याला १६ फेब्रुवारीपासून २०२२ पासून ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. असे असतानाही तो वागळे इस्टेटमध्ये वास्तव्य करत होता. रविवारी त्याला परबवाडी परिसरातून अटक केली.

Story img Loader