ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांची गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आनंद दिघे यांच्या निधनानंतर रघुनाथ मोरे यांनी आम्हा शिवसैनिकांना आधार दिला होता. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभत होते. त्यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबाची हानी झाली आहे असे शिंदे म्हणाले.

माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे (७६) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे हे हयात असताना रघुनाथ मोरे यांच्याकडे ठाणे शहरप्रमुख पदाची जबाबदारी होती. आनंद दिघे यांच्या निधनानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोरे यांच्यावर ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. रघुनाथ मोरे हे जिल्हा प्रमुख असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने ठाणे महापालिका निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत शिवसेनेने यश संपादित केले होते. परंतु रघुनाथ मोरे यांचाही अपघात झाला. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त राहिले होते. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी रघुनाथ मोरे यांची भेट घेत असत.

Home buyers cheated in Kalyan Dombivli
कल्याण, डोंबिवलीत घर खरेदीदारांची फसवणूक
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा >>>ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण

रविवारी त्यांच्या निधनानंतर शिवसेनेकडून शोक व्यक्त केला गेला. गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या ठाण्यातील पाचपाखाडी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आनंद दिघे यांच्या निधनानंतर आम्हाला रघुनाथ मोरे यांनी आधार दिला. संघटना वाढविण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ते प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्य मानत होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार मानणारे ते कडवट शिवसैनिक होते. त्यांच्या निधनाने शिवसेना परिवाराची हानी झाली आहे. मोरे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे राहू असे शिंदे म्हणाले.

Story img Loader