ठाणे : ‘रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ‘ऑटोफेस्ट-२०२५’ या ऑटो कार फेस्टिव्हलचे उद्घाटन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पोर्ट्स बाईकपाठोपाठ रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला. यानिमित्ताने सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहसाठी रिक्षा चालविण्याचे काम करणाऱ्या शिंदे यांच्या हातात रिक्षाचे स्टेरिंग दिसून आले. तसेच रिक्षा चालविण्याचा आंनद लुटत त्यांनी जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९६४ रोजी साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या ठिकाणी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एकनाथ शिंदे यांची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे त्यांनी लहान वयातच गाव सोडत ठाणे गाठले. येथेच ते स्थायिक झाले. त्यांनी मंगला हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश हायस्कूलमधून अकरावीचे शिक्षण घेतले. पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना कॉलेज सोडावे लागले. त्यांनी ठाण्यातील एका मासळी विकणाऱ्या कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. तिथे ते सुपरव्हायझर म्हणून काम करीत होते. परंतु ही नोकरीसुद्धा सोडत त्यांनी ठाण्यात रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. पण हे काम करत असतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या विचाराने प्रभावित होऊन पक्षाचे काम करीत होते. पुढे नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले.

हेही वाचा – “सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

आजही राज्याचे मंत्री म्हणून कार्यरत असले तरी ज्या व्यवसायातून करियरची सुरुवात केली, त्या विषयी त्यांच्या मनात आजही आपुलकी दिसून येते. त्यांनी रिक्षाचालकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. तसेच रिक्षाचालकाचे काम केल्याचे ते सातत्याने अभिमानाने सांगतात. त्यांची रिक्षाविषयीची आपुलकी पुन्हा एकदा दिसून आली आणि यातूनच ऑटोफेस्टमध्ये रिक्षा चालविली.

हेही वाचा – ठाण्यात मदत यंत्रणेच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना, इमारतमधील लॉन्ड्री दुकानात आग लागल्याने सर्वत्र पसरला होता धूर

रविवारी ‘रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ‘ऑटोफेस्ट-२०२५’ या ऑटो कार फेस्टिव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी त्यांनी स्पोर्ट्स बाईक आणि रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला. रिक्षाचे स्टेरिंग शिंदे यांच्या हातात होते तर, या रिक्षात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगपती गौतम सिंघानिया हे बसले होते. यानिमित्ताने त्यांनी जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister eknath shinde rickshaw old memories raymond company and super club organized autofest 2025 thane ssb